शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

मोठी बातमी! दसऱ्याआधीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी; दोन दिवसांत बोनस मिळणार

By हेमंत बावकर | Updated: October 21, 2020 15:46 IST

Diwali Bonus to Central Government: केंद्र सरकारच्या 30 लाख 67 हजार कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जाणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्रिमंडळाने 2019-20 मधील बोनस मंजूर केला आहे. बोनसची ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे वळती केली जाणार आहे. केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये प्राण फुंकण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी ऑफर देऊ केली आहे.

केंद्र सरकारने आपल्या 30 लाख कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर दिली आहे. दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला असून तो लगेचच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. 

केंद्रीय मंत्रिमंडळाने 2019-20 मधील बोनस मंजूर केला आहे. याचा फायदा 30 लाख गैर-राजपत्रित कर्मचाऱ्यांना होणार आहे. हा बोनस 3,737 कोटी एवढा आहे, असे जावडेकर म्हणाले. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली. बोनसची ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे वळती केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे हा बोनस विजयादशमीच्या आधीच दिला जाणार आहे. 

याचा फायदा केंद्र सरकारच्या 30 लाख 67 हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. तसेच जम्मू-काश्मिरमध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेलाही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे तिथे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या धर्तीवर निवडणुका होणार आहेत, असे जावडेकर म्हणाले. 

निर्मला सीतारामन यांचीही वेगळी ऑफर

केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये प्राण फुंकण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी ऑफर देऊ केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याची घोषणा केली असून बाजारातील मागणी वाढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. अर्थव्यवस्थेतील मागणी वाढविण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना LTC कॅश व्हाऊचर आणि फेस्टिव्हल अॅडव्हान्स स्कीम लागू करण्यात आली आहे. 

प्रवास भत्ता (LTC) चे कॅश व्हाऊचर देण्यात येणार आहेत. हे व्हाऊचर कर्मचारी बाजारात खर्च करू शकणार आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल. या स्कीमचा लाभ पीएसयू आणि सार्वजनिक बँकांच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. 

एलटीसीच्या बदल्यातील नकदी व्यवहार डिजिटल करता येणार आहे. हा एलटीसी 2018-21 या काळातील असणार आहे. याद्वारे ट्रेन किंवा विमान प्रवास केल्यास करमुक्त असणार आहे. यासाठी कर्मचाऱ्याचे भाडे आणि अन्य खर्च तिप्पट असायला हवा. याचप्रकारे एखाद्या जीएसटी नोंद असलेल्या दुकानदाराकडून सामान डिजिटल पेमेंटने खरेदी केल्यास लाभ मिळणार आहे. अशाप्रकारे केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या खर्च करण्यामुळे 28 हजार कोटी रुपयांची रक्कम अर्थव्वस्थेत येणार आहे, असे सीतारामण यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरDiwaliदिवाळीGovernmentसरकार