शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! मातेचे दूध विक्री करण्यावर बंदी; FSSAI चा इशारा, सापडल्यास ५ लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 13:28 IST

FSSAI Ban on Sale of Breast Milk: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने अशी विक्री चुकीची असल्याचा आदेश दिला असून याचे व्यापारीकरण बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

काही कंपन्यांनी, स्टार्टअपनी मातेचे दूध विकण्यास सुरुवात केली होती. यामुळे ज्या बालकांना आईचे दूध मिळत नाही त्यांच्यासाठी ही बाब उपयोगी ठरत होती. परंतु भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने अशी विक्री चुकीची असल्याचा आदेश दिला असून याचे व्यापारीकरण बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. तसेच याबाबत काही मार्गदर्शक तत्वे ठरविण्यात आली असून अशापद्धतीने विक्री करताना आढळल्यास त्या विक्रेत्याला ५ लाख रुपयांचा दंड करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. 

एफएसएसएआयने अशा प्रकारे मातेचे दूध विक्री करण्यास परवानगी देण्यास नकार दिला आहे. मानवी दूध आणि त्याच्या उत्पादनांच्या व्यापारीकरणाशी संबंधित सर्व गोष्टी थांबविण्यात याव्यात, असेही प्राधिकरणाने म्हटले आहे. मानवी दूध आणि त्याच्या उत्पादनांचे व्यापारीकरण करण्यासाठी अनेक कंपन्या, संस्थांकडून मागणी करण्यात आली होती. त्यावर FSSAI ने हा निर्णय जाहीर केला आहे. FSS कायदा, 2006 व अन्य कायद्यांमध्ये अशी परवानगी नाही. यामुळे असे कोणी विकत असेल तर ते तातडीने थांबवावे. अन्यथा नियमांचे उल्लंघन मानले जाईल व कारवाई केली जाईल असा इशाराही FSSAI ने दिला आहे. 

काही कंपन्या दुग्धजन्य पदार्थांच्या नावाखाली मानवी दुधाचा व्यापार करत आहेत. आईचे दूध केवळ दान केले जाऊ शकते. त्याच्या बदल्यात कोणताही पैसा किंवा लाभ घेता येत नाही. दान केलेले दूध हे विक्री किंवा त्याचा व्यापार करता येणार नाही. विक्रीमध्ये गुंतलेल्या अशा FBOs ला कोणताही परवाना दिला जाणार नाही याची काळजी राज्य आणि केंद्राने घ्यावी असेही FSSAI ने आदेशात म्हटले आहे. 

काही कंपन्या दुग्धजन्य पदार्थांचा हवाला देत FSSAI कडून परवाना मिळविण्यात यशस्वी ठरल्या होत्या. ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडियाने सरकारला अशा कंपन्यांवर कारवाई करण्याची विनंती केली होती. उल्लंघन करणाऱ्यांना 5 वर्षांपर्यंत कारावास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. 

टॅग्स :Womenमहिला