शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मोठा स्फोट; 14 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 20:06 IST

पंजाबमध्ये शीख समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात फटाक्यांच्या ट्रॉलीला आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

चंदीगडः पंजाबमध्ये शीख समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात फटाक्यांच्या ट्रॉलीला आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ट्रॉलीला आग लागल्यानंतर स्फोटही झाला असून, जवळपास 14 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अनेक जण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.पंजाबमध्ये शीख समाजाकडून नगर कीर्तन हा धार्मिक कार्यक्रम धूमधडाक्यात साजरा केला जातो. त्याचदरन्यान तरनतारन जिल्ह्यात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्याचदरम्यान काही फटाक्यांची ठिणगी ट्रॉलीमध्ये पडली आणि बघता बघताच ट्रॅक्टर ट्रॉलीला आग लागली.या ट्रॉलीमध्ये फटाके फुटल्यानंतर भीषण स्फोट झाला. धार्मिक कार्यक्रमासाठी अनेक लोक पहुविंड ठिकाणाहून गुरुद्वाऱ्यात जाण्यासाठी रवाना होत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून, पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.