शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 14:05 IST

इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आयोगाने निवडणूक काळात झालेल्या गोंधळावरून होत असलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिले आहे.

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रचार ते मतदान प्रक्रियेदरम्यान उष्णतेने सर्वांना हैराण केले होते. यामुळे ऐन उन्हाच्या कडाक्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करणाऱ्या आयोगावर टीका होत होती. यामुळे पुढील लोकसभा निवडणूक एक महिना आधीच घेण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला आहे. 

इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आयोगाने निवडणूक काळात झालेल्या गोंधळावरून होत असलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिले आहे. सोशल मीडियावर सुरु असलेल्या 'लापता जेंटलमैन वापस आ गए' मीम्सवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिले आहे. आम्ही कधीच बेपत्ता झालो नव्हतो, असे उत्तर राजीव कुमार यांनी विरोधकांना दिले आहे. तसेच आचारसंहिता काळात १० हजार कोटी रुपयांची कॅश, वस्तू जप्त करण्यात आल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

तसेच ऐन उन्हाच्या कडाक्यात निवडणुका झाल्याचेही आयोगाने मान्य केले. पुढील लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत संपविण्यात येणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. यंदाची निवडणूक १ जूनपर्यंत लांबली होती. ४ जूनला मतमोजणी होणार आहे. आयोगाच्या नव्या घोषणेनुसार भविष्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात मतमोजणी होणार आहे. म्हणजेच मार्चमध्ये जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीमध्ये जाहीर केला जाणार आहे. 

राजीव कुमार काय म्हणाले...आम्ही भारतीय मतदारांचे उभे राहून आभार मानतो. ८५ वर्षांवरील मतदारांनी घरबसल्या मतदान केले. 1.5 कोटी मतदार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी 135 विशेष गाड्या, 4 लाख वाहने आणि 1692 विमानांचा वापर करण्यात आला. मोठ्या ब्रँडपासून स्टार्टअपपर्यंत सर्वांनी स्वेच्छेने योगदान दिल्याचे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.  मतदान कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा देखील कुमार यांनी दाखला दिला आहे. मतदान कर्मचाऱ्यांना मतदानाला जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जेव्हा त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते तेव्हा त्यांच्या अंतःकरणातून काय जात असेल याची कल्पना करा, असा सल्लाही निवडणूक आयुक्तांनी दिला. जम्मू-काश्मीरमध्ये 4 दशकात सर्वाधिक मतदान झाले आहे. खोऱ्यात ५८.५८% आणि जम्मूमध्ये ५१.०५% मतदान झाले. याच आधारावर पुढील विधानसभा निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४