शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

1 डिसेंबर: आजपासून मोठे बदल; जाणून घ्या LPG सिलिंडरचे नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 10:51 IST

LPG Gas Cylinder rates: एक डिसेंबर २०२० म्हणजेच आजपासून भारतात मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा सामान्यांच्या जिवनावर मोठा परिणाम जाणवणार आहे.

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरचे दर ठरवितात. प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असल्याने त्यानुसार गॅस सिलिंडरच्या दरात फरक असतो. नेहमी प्रमाणे आजही गॅस कंपन्यांनी दराचा आढावा घेतला आहे. यानुसार घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात ऑक्टोबरच्या किंमतीत काही बदल करण्यात आलेला नाही. तर व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार 14.2 किलोचा सबसिडी नसलेला गॅस सिलिंडर दिल्लीमध्ये 594 रुपये आहे. कोलकातामध्ये 620.50 रुपये, मुंबईत 594 रुपये आणि चेन्नईत 610 रुपये आहे. 

बेकरी हॉटेलसारख्या आस्थापनांमध्ये वापरण्याच येणारा कमर्शिअल गॅस सिलिंडरचा दर वाढविण्यात आला आहे. चेन्नईत हा दर वाढून 1410 रुपये झाला आहे. दिल्लीमध्ये 55 रुपयांनी वाढून 1296 रुपये, कोलकातामध्ये 55 रुपयांनी वाढून 1351रुपये आणि मुंबईत देखील 55 रुपयांनी वाढून 1244 रुपये झाला आहे. सध्या केंद्र सरकार एका कुटुंबाला वर्षाला १२ सिलिंडर सबसिडीवर देते. त्यापेक्षा जास्त सिलिंडर हवा असल्यास बाजारभावाने तो घ्यावा लागतो. ही किंमत दर महिन्याला आंतरराष्ट्रीय बाजारानुसार ठरविली जाते.

एक डिसेंबर २०२० म्हणजेच आजपासून भारतात मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा सामान्यांच्या जिवनावर मोठा परिणाम जाणवणार आहे. नवीन नियामांमध्ये एकीकडे दिलासा मिळेल, तर दुसरीकडे काही गोष्टींची काळजी न घेतल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. 

विम्याचे नियम बदललेकोरोना काळात लोकांनी मोठ्या प्रमाणावर विमा घेतला आहे. मात्र, त्याच्या हप्त्याची चिंताही वाढली आहे. आता पाच वर्षांनी विमाधारक त्यांच्या विम्याचा हप्ता कमी करू शकतात. ते हा हप्ता ५० टक्क्यांपर्यंत कमी करू शकणार आहेत. यामुळे विमा धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण निम्मा हप्ता भरून विमाधारक त्याची पॉलिसी जारी ठेवू शकणार आहेत. यामुळे त्यांच्यावर जादा आर्थिक बोजा पडणार नाही.

आरटीजीएसआरबीआयने पैशांच्या व्यवहारामध्ये मोठा बदल केला आहे. ऑक्टोबरमध्ये ही घोषणा करण्यात आली होती. आरटीजीएसद्वारे १ डिसेंबरपासून २४ तास पैसे पाठविता येणार आहेत. यामुळे बँका उघडण्याची वाट पहावी लागणार नाही. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. आरटीजीएसद्वारे कमीत कमी दोन लाखांपर्यंत पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. तर दोन लाखांवरील रक्कमेला कोणतीही मर्यादा नाही.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरbankबँक