शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Update: कोरोना व्हायरसचा कहर कधी संपणार? तज्ज्ञांनी दिला मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 18:40 IST

डॉक्टरांनी कोविड-19 बाबत एक मोठी अपडेट दिली आहे.

गेल्या दोन वर्षापासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संदर्भात आता एक मोठी अपडेट आली आहे. कोरोनाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात जास्त मृत्यू दिसले आहेत, पण कोरोना व्हायरससंदर्भात आणखी एक मोठी अपडेट समोर आले आहे. जगातील बहुतेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत आहेत. शनिवारी भारतात कोरोना व्हायरसच्या ७१७१ रुग्णांची नोंद झाली आहे. संपूर्ण आठवडाभरात १० हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना कमी होण्यास सुरुवात झाली आहे आणि आराम फक्त १५-२० दिवसांवर आहे, येत्या २ ते ३ आठवड्यांत, कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने घट होईल, असं तज्ञांनी म्हटले आहे. 

आता युरोप आणि अमेरिकेत कोरोना कमी होत आहे, पण दक्षिण आशिया आणि पूर्व भागात अजूनही रुग्ण जास्त आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, फक्त xbb व्हेरियंट आणि BA.2.75 अजूनही जगाच्या बहुतेक भागांमध्ये पसरले आहेत. भारतात वाढणारे रुग्ण  देखील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची असतील आणि लवकरच कमी होतील. गेल्या महिन्यापासून भारतात मृत्यूची संख्या थोडी वाढली आहे, पण तज्ञांचे असे मत आहे की अशा रुग्णांपैकी बहुतेक रुग्ण आधीच कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहेत आणि त्यांची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आहे. 

बारसूत जमीन घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

आकडेवारीनुसार,  गेल्या ५ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण सातत्याने कमी होत आहेत. शनिवारी, २९ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारतात २४ तासात कोरोनाचे ७१७१ रुग्ण नोंदवले आहेत आणि एकूण रुग्णांची संख्या ५१,३१४ झाली आहे. मृतांची संख्या ४० च्या आसपास आहे. २८ एप्रिल रोजी भारतात कोविडची ७५३३ नवीन  रुग्ण नोंदवण्यात आली. तर एकूण रुग्णांची संख्या ५३,८५२ होती.

या दिवशी ४४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २७ एप्रिल रोजी कोरोनाचे ९३५५ रुग्ण  नोंदवण्यात आली होती, तर एकूण कोविड रुग्णांची संख्या ५७४१० होती आणि मृत्यूची संख्या २६ होती. २६ एप्रिल रोजी ९६२९ नवीन रुग्ण नोंदवण्यात आली. एकूण रुग्णांची संख्या ६१०१३ होती आणि २९ जणांचा मृत्यू झाला होता. २५ एप्रिल ६६६० नवीन रुग्णांची नोंद झाली. तर एकूण रुग्ण ६३३८० होती. या आकड्यांवरून आठवड्यात कोरोनाचे एकूण रुग्णही कमी झाले आहेत असं दिसतंय. आता १५-२० दिवसांत कोरोनापासून मुक्ती मिळू शकेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या