सायकलची विचारणा करणाऱ्यास मारहाण
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
सायकलची विचारणा करणाऱ्यास मारहाण
सायकलची विचारणा करणाऱ्यास मारहाण
सायकलची विचारणा करणाऱ्यास मारहाणनागपूर : आपल्या सायकलबाबत विचारणा करणाऱ्या व्यक्तीला विटा आणि दगड मारून जखमी केल्याची घटना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान घडली. बलराम गुप्ता हे आपल्या सायकलची विचारणा करण्यासाठी गेले होते. आरोपी शिवकुमार ब्रिजलाल तिवारी (५७), रिंकु ऊर्फ कुलदीप शिवकुमार तिवारी (३६), कोकीळा तिवारी, प्रिंस तिवारी यांनी त्यास शिविगाळ करून मारहाण केली. यावेळी विक्रांत विनोद गुप्ता (३६) रा. परदेशी तेलीपुरा हे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांनाही आरोपींनी विटा, दगडाने मारून जखमी केले. गणेशपेठ पोलिसांनी शिवकुमार तिवारी, रिंकु ऊर्फ कुलदीप तिवारी यांना अटक केली आहे.