शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाद्वारे स्थापित समितीतून भूपिंदरसिंग मान बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 05:54 IST

शेतकऱ्यांना साथ देण्याचा निर्धार

विकास झाडे

नवी दिल्ली : शेतीविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याबरोबरच केंद्र सरकार व आंदोलक शेतकरी यांच्यातील वाद मिटविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापित चार जणांच्या समितीतील सदस्य भूपिंदरसिंग मान यांनी समितीतून बाहेर पडत असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. आपण शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करू शकत नसल्याचे कारण सांगत मान यांनी समितीचा त्याग केला. दरम्यान, शेतकरी आंदोलनाला गुरुवारी ५० दिवस पूर्ण झाले. 

केंद्र सरकार व शेतकरी संघटना यांच्यातील वाद मिटविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार जणांची समिती स्थापन केली. त्यात मान यांच्यासह अनिल घनवट, प्रमोदकुमार जोशी आणि अशोक गुलाटी यांचा समावेश आहे. मात्र, ही समिती सरकारधार्जिणी असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनांनी या समितीशी चर्चा न करण्याचा निर्णय जाहीर केला. या सर्व पार्श्वभूमीवर मान यांनी गुरुवारी एका पत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली. आपण एक शेतकरी असण्याबरोबरच शेतकरी संघटनेचे नेतेही आहोत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापित समितीत सदस्य म्हणून राहण्याचे तत्त्वात बसत नाही सबब या समितीचा त्याग करत आहे, असे मान यांनी या पत्रकात स्पष्ट केले आहे. मान यांच्या या निर्णयाचे शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी स्वागत केले. यंदाचा प्रजासत्ताक दिन ऐतिहासिक असेल, असे संकेतही टिकेत यांनी दिले. 

कायद्याच्या प्रती जाळल्या आंदोलनाला ५० दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आंदोलन देशव्यापी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, राजस्थाननंतर अन्य राज्यांतील शेतकरी सामील झाल्याने या चळवळीने देशव्यापी स्वरूप धारण केले आहे.  तिन्ही कृषी कायदे रद्द करावे आणि एमएसपीला कायदेशीर अधिकार द्यावेत या मागण्यांवर शेकरी ठाम आहेत. शेतकरी नेते डॉ. दर्शन पाल म्हणाले की, तीन कृषी कायद्यांची प्रत जाळून लोहडीचा सण साजरा करण्यात आला आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपNew Delhiनवी दिल्ली