शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

चांदीची वीट ठेवून राममंदिराचे भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 05:16 IST

२२ किलो वजनाची वीट : भगवान रामांना रत्नजडीत पोषाख

त्रिजुगी नारायण तिवारी।लोकमत न्यूज नेटवर्कअयोध्या : राम मंदिर भूमिपूजनाची तयारी अंतिम टप्प्यात असून ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत २२.६ किलो चांदीची वीट ठेऊन राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे.

फैजाबादचे भाजपचे खासदार लल्लू सिंह यांनी याबाबत टष्ट्वीट करुन माहिती दिली आहे. त्यांनी या विटेचे छायाचित्र शेअर करुन सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळणार आहे. चांदीच्या या विटेचे वजन २२ किलो ६०० ग्रामआहे. भगवान राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्तीला रत्नजडीत पोषाख परिधान करण्यात येणार आहे. या पोषाखात ९ प्रकारचे रत्न असणार आहेत. दुपारी १२.१५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान, मंदिराखाली टाइम कॅप्सूल ठेवणार असल्याचे वृत्त आले होते. मात्र आता, महासचिव चंपत राय यांनी टाइम कॅप्सूल ठेवण्यात येणार नाही, असे म्हटले आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून अयोध्येची विकास योजना तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. राम मंदिर ते बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, विमानतळाला रुंद रस्त्याने जोडण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सहादतगंंज बायपास ते नवा घाटपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येईल. यावर २१० कोटी रुपये खर्च करण्यात येतील. अयोध्या ते सुल्तानपूर रोडवर बनविण्यात येत असलेल्या विमानतळाला जोडण्यासाठी दीड किमी चार पदरी रस्त्याची निर्मिती करण्यात येणार आहे.अयोध्येत चारही बाजूंनी रिंग रोडअयोध्येत चारही बाजूंनी रिंग रोड बनविण्यात येणार आहे. यामुळे अयोध्येत येणाऱ्या भाविकांना सहजपणे येता येईल. अयोध्येच्या परिसरातील सात रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. अयोध्येतील विविध रस्ते रुंद करण्यात येणार आहेत. निवासाची व्यवस्था करण्यासाठी निवास विकास परिषदेकडून ६०० एकरमध्ये नवी अयोध्या वसविण्याचा प्रयत्न आहे.अयोध्येतील प्रमुख स्थाने हनुमान गढी, दशरथ महाल, कनक भवन, जानकी मंदिर, दिगंबर आखाडा, राजद्वार येथे विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. अयोध्येचे जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या.अयोध्येतील प्रमुख ठिकाणी भगवान रामांचे चित्र काढण्यात येत आहेत. पूर्ण अयोध्येत सध्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या तयारीची लगबग दिसून येत आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर