शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल 40 वर्षांनी नष्ट होणार ‘तो’ विषारी कचरा; 'त्या' दुर्घटनेत गेले होते ५ हजार जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 07:09 IST

भोपाळ गॅस दुर्घटनेला ४० वर्षे उलटूनही ‘युनियन कार्बाइड’ कारखान्याच्या विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याबद्दल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत ३ डिसेंबर रोजी राज्य सरकारला या कचऱ्याची विल्हेवाट चार आठवड्यांत लावण्याचे निर्देश दिले होते.

इंदूर : इंदूरजवळील पिथमपूर येथे १९८४ च्या भोपाळ वायू दुर्घटनेला जबाबदार असलेल्या ‘युनियन कार्बाइड’ कारखान्याचा ३३७ टन विषारी कचरा नष्ट करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. हा कचरा राज्याच्या राजधानीत असलेल्या ‘युनियन कार्बाइड’ कारखान्यात पडून आहे. येथे २ आणि ३ डिसेंबर १९८४च्या मध्यरात्री ‘मिथाइल आयसोसायनेट’ हा विषारी वायू बाहेर पडला होता. या घटनेत ५,४७९ लोक मारले गेले आणि पाच लाखांहून अधिक लोक दीर्घकालीन अपंगत्वाने ग्रस्त झाले.

भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर बंद असलेल्या युनियन कार्बाइड कारखान्यातून ३३७ टन रासायनिक कचरा पिथमपूर येथील एका खासगी कंपनीच्या कचरा विल्हेवाटीच्या युनिटमध्ये नेण्याची व्यवस्था अंतिम टप्प्यात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पिथमपूर हे राज्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र आहे.

कोर्टाने टाेचले होते कान :भोपाळ गॅस दुर्घटनेला ४० वर्षे उलटूनही ‘युनियन कार्बाइड’ कारखान्याच्या विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याबद्दल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत ३ डिसेंबर रोजी राज्य सरकारला या कचऱ्याची विल्हेवाट चार आठवड्यांत लावण्याचे निर्देश दिले होते.

लागणार ९ महिने?- गॅस दुर्घटनेतील कचरा हा एक कलंक आहे जो ४० वर्षांनंतर दूर होणार आहे. आम्ही ते सुरक्षितपणे पिथमपूरला पाठवू व नष्ट करू. हा रासायनिक कचरा भोपाळहून पिथमपूरला पाठवण्यासाठी सुमारे २५० किमी लांबीचा ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. - तपासात सर्वकाही ठीक आढळल्यास, तीन महिन्यांत कचरा जाळण्यात येईल, अन्यथा नऊ महिने लागू शकतात.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश