शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अखेर शिवराजसिंह चौहानांच्या मंत्रिमंडळाचा 'जंबो' विस्तार; जाणून मंत्र्यांची संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 12:46 IST

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कॅबिनेटचा विस्तार केला असून, आता 28 मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे.

भोपाळः कोरोनाच्या संकटात अनेक अडचणींवर मात करत अखेर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या 'जंबो कॅबिनेट'चा विस्तार करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी गेल्या आठवड्याभरापासून चर्चा सुरू होती. अखेर त्याला आज मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. ज्योतिरादित्य शिंदे आणि भाजपामधील त्यांचे समर्थक असलेल्या आमदारांना शिवराज मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.  भाजपाच्या मध्य प्रदेशातील नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्वाकडे समर्थकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्यासाठी शिंदेंनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यावर चर्चाही सुरू होती. अखेर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कॅबिनेटचा विस्तार केला असून, आता 28 मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी सकाळी ११ वाजता सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. यात २० कॅबिनेट, तर ८ राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे. शिंदे गटाच्या १० आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. शपथविधीनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सर्व नव्या मंत्र्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, 'आज (2 जुलै) शपथ घेणार्‍या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. मध्य प्रदेशातील प्रगती, विकास आणि कल्याणची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र काम करू या. मला खात्री आहे की, राज्यात नवनिर्माण करण्यासाठी आपलं पूर्ण सहकार्य आणि योगदान मिळेल.शिवराज सिंह चौहानांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादीगोपाळ भार्गवविजय शहाजगदीश देवराबिसालाललालयशोधराज सिंधियाभूपेंद्र सिंहएडलसिंग कानशानाब्रिजेंद्र प्रताप सिंहविश्वास सारंगइम्रती देवीप्रभूराम चौधरी डॉमहेंद्रसिंग सिसोदियाप्रद्युम्नसिंग तोमरप्रेमसिंह बघेलप्रेमसिंह पटेलओमप्रकाश सकलेचाउषा ठाकूरअरविंद्रसिंग भदोरियामोहन यादव भदोरियाहरदीपसिंग शेणराजवर्धनसिंग ओथभरतसिंगइंदरसिंग परमारराम खिलवान पटेलराम किशोर कानवेब्रिजेंद्रसिंग यादवगिरराज दंडौतियासुरेश धाकडओपीएस भदोरिया

दिल्लीत काही तासांच्या बैठकीनंतर नवीन मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तबशिवराजसिंह चौहान नुकतेच नवी दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी अमित शाह, जेपी नड्डा यांच्या व्यतिरिक्त त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत घेतलेल्या काही तासांच्या बैठकीनंतर नव्या मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, मध्य प्रदेशचे विद्यमान राज्यपाल लालजी टंडन यांची प्रकृती खालावल्यानंतर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला, जेणेकरून घटनात्मक प्रक्रिया अखंडितपणे सुरू राहू शकेल. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराला काहीसा उशीर झाला.  

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान