शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भोपाळमध्ये १००० खाटांचे जम्बो क्वारंटाईन सेंटर, रुग्णांना भव्य पडद्यावर रामायण पाहण्याची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 17:32 IST

quarantine center : हे क्वारंटाईन अशा कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आले आहे, ज्यांच्या घरी आयसोलेशनमध्ये राहण्याची व्यवस्था नाही.

ठळक मुद्देया क्वारंटाईन सेंटरमध्ये खाटांजवळ पाणी गरम करण्याची व्यवस्था आणि मोबाईल चार्जिंग पॉईंट असणार आहे.

भोपाळ : कोरोना संकट काळाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये असलेल्या मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये १००० खाटांचे क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात आले आहे. भोपाळ जिल्हा भाजपा आणि माधव सेवा केंद्रच्यावतीने तयार करण्यात आलेल्या या क्वारंटाईन सेंटरचे उद्धाटन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. विशेष म्हणजे, या क्वारंटाईन सेंटरमध्ये टीव्हीवर योगापासून ते रामायण दाखवण्याची सोय करण्यात आली आहे. (bhopal 1000 bed quarantine center started facility to show ramayana and mahabharata serial mp corona crisis) 

याचबरोबर, हे क्वारंटाईन अशा कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आले आहे, ज्यांच्या घरी आयसोलेशनमध्ये राहण्याची व्यवस्था नाही. तसेच या सेंटरमध्ये वेगवेगळे वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. त्या प्रत्येक वॉर्डला स्वातंत्र्य सैनिक आणि महापुरुषांची नावे देण्यात आली आहे. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, अब्दुल कलाम, सरदार पटेल, राजा भोज, राणी लक्ष्मीबाई, राणी कमलापती अशी नावे वॉर्डला देण्यात आली आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये ३५ ते ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

रामायण पाहण्याची व्यवस्थाया क्वारंटाईन सेंटरमध्ये खाटांजवळ पाणी गरम करण्याची व्यवस्था आणि मोबाईल चार्जिंग पॉईंट असणार आहे. ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांजवळ ऑक्सिजन कंसट्रेटर मशीन ठेवण्यात आली आहे. याशिवाय, रुग्णांना याठिकाणी रोज योगा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, सेंटरमध्ये मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. त्याच्यावर रामायण आणि महाभारत या मालिका दाखवल्या जाणार आहेत. त्याचबरोबर दिवसभर महामृत्यूंजय मंत्र आमि गायत्री मंत्र जप चालणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशCorona vaccineकोरोनाची लस