शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

१२0 महिलांवर बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 01:46 IST

हरयाणातील प्रकार; सापडल्या व्हिडीओ क्लिप्स; ब्लॅकमेल करण्याचाही आरोप

फतेहाबाद : तब्बल १२0 महिलांना फसवून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून हरयाणा पोलिसांनी ६0 वर्षे वयाच्या बाबा अमरपुरी या भोंदूबाबाला अटक केली आहे. त्याला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविण्यात आले असून, ज्यांची त्याने फसवणूक केली वा ज्यांच्यावर शारीरिक अत्याचार केले, त्या महिलांनी पुढे येऊ न तक्रार दाखल करावी, यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.महिलांवर बलात्कार करताना हा भोंदूबाबा आपल्या मोबाइलद्वारे त्याचे चित्रीकरण करीत असे आणि त्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करीत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याच्याकडून १२0 व्हिडीओ क्लिप्सही हस्तगत केल्या आहेत. त्यात तो वेगवेगळ्या महिलांसोबत दिसत आहे. या बाबाने त्यातील काही व्हिडीओज सोशल मीडियावरून प्रसारितही केले होते. ते फतेहाबाद शहरात व्हायरल झाल्यानंतर, लगेचच पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. असे व्हिडीओ शेअर वा फॉरवर्ड करू नका, असे आवाहन पोलिसांनी जनतेला केले आहे. स्वत:ला ‘बाबा अमरपुरी’ म्हणवून घेणाºया या बाबाचे खरे नाव ‘अमरवीर’ असले, तरी तो पूर्वी ‘बिल्लू’ याच नावाने ओळखला जात असे. एका पीडितेच्या नातेवाइकाने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर, महिला पोलीस ठाण्यात पोलिसांनी स्वत:हून तक्रार नोंदवून कारवाई सुरू केली. महिला पोलीस ठाण्याच्या प्रमुख बिमला देवी यांनी सांगितले की, या बाबावर बलात्कार, विनयभंग, फसवणूक, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या काही कलमांन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर बलात्कार करीत असे व चित्रीकरण करीत असे. मग त्याच्या आधारे ब्लॅकमेल करून महिलांना पुन्हा बोलावत असे. न आल्यास तुमचा व्हिडीओ सर्वांना दाखवेन, अशी धमकी देत असे. (वृत्तसंस्था)भाजपा नेत्यावर आरोपआपणावर भाजपाच्या नीलेश सिंह या नेत्याने बलात्कार केल्याची तक्रार करूनही पोलीस कारवाई करण्यास तयार नाहीत, असा आरोप रायबरेली जिल्ह्यातील महिलेने केला आहे. आपला अश्लील व्हिडीओ तयार करून तो आपणास ब्लॅकमेल करीत आहे, अशी महिलेली तक्रार आहे. गेल्या दीड महिन्यांपासून आपल्यावर नेता लैंगिक अत्याचार करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आता ती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारHaryanaहरयाणा