शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षण संस्थेतून महिला सशक्तीकरणाला बळ, उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 02:24 IST

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी येथे शनिवारी विभागीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेचे (आरव्हीटीआय)भूमिपूजन केले. तेलंगणातील हे पहिले कौशल्य विकास केंद्र असून, यासाठी १९.०५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत

हैदराबाद : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी येथे शनिवारी विभागीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेचे (आरव्हीटीआय)भूमिपूजन केले. तेलंगणातील हे पहिले कौशल्य विकास केंद्र असून, यासाठी १९.०५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. चार एकर जागेवर ही संस्था उभारण्यात येणार आहे. दरवर्षी किमान १,००० जणांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांच्या कौशल्यविकासाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.कौशल्यविकास, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती, तर राज्याचे उपमुख्यमंत्री मोहंमद महेमूद अली, गृहमंत्री नैनी नरसिंह रेड्डी, माजी मंत्री बंडारू दत्तात्रेय यांची उपस्थिती होती. विभागीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी १,००० जणांना प्रशिक्षित करण्यात येणार असून, यात ४८० महिलांचा समावेश असणार आहे. या संस्थेत फॅशन डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी, वास्तुकला सहायक, सौंदर्यप्रसाधन, फ्रं ट आॅफिस असिस्टंट, खाद्य आणि पेयपदार्थ, सेवा सहायक आदी अभ्यासक्रम आहेत.यावेळी बोलताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले की, देशात प्रशिक्षक आणि शिक्षक यांची मोठी कमतरता आहे; पण आता प्रशिक्षणाच्या खूप संधी आहेत हे पाहून आपल्याला अतिशय आनंद होत आहे.अर्थव्यवस्थेला ताकदकौशल्यविकासाच्या माध्यमातून केवळ आपल्या देशाातील उद्योगांनाच नव्हे, तर जगातील अर्थव्यवस्थेला ताकद मिळणार आहे. कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, महिलांचे प्रशिक्षण आणि त्यांचे सशक्तीकरणाचे कार्य सरकार प्राधान्याने करीत आहे. प्रत्येक राज्यात एक विभागीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ११ कें द्रीय सरकारी संस्था आणि १,४०८ राज्य महिला आयटीआयच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. उत्तर प्रदेश व मध्यप्रदेशात पाच नव्या व्यावसायिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आल्याचेही नायडू यांनी सांगितले़