शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना भारतरत्न ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 20:39 IST

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. याचबरोबर,  नानाजी देशमुख आणि डॉ. भूपेन हजारिका यांना सुद्धा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. 

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना केंद्र सरकारकडून भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. याचबरोबर, राजकारणातील ऋषी व समाजसेवेतील महर्षी असे व्यक्तिमत्व असलेले दिवंगत नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार दिवंगत भूपेन हजारिका यांनाही भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. 

देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी राष्ट्रपती भवनातून करण्यात आली. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे देशाच्या राजकारणातील योगदान मोठे आहे. राष्ट्रपती होण्याआधी प्रणव मुखर्जी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारमध्ये ते सर्वात ज्येष्ठ मंत्री राहिले. तर, नानाजी देशमुख हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवारांच्या विचारांचा प्रभाव नानाजी देशमुख यांच्या मनावर होता. संगीतकार भूपेन हजारिका यांनी आपले संपूर्ण आयुष्य संगीतासाठी घालवले. त्यांची पहाडी आवाजाचा गायक अशी ख्याती होती. भूपेन हजारीका हे त्यांची गाणी स्वतः लिहित आणि संगीतबद्ध करत होते.

दरम्यान, 1954 पासून भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत 45 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2015 मध्ये मदनमोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्यात आला होता. त्यानंतर आता प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना जाहीर झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भारतरत्न पुरस्कारांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि  भूपेन हजारिका यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. 'प्रणवदा आमच्या काळातील सर्वोत्कृष्ट राजकीय नेते आहेत. त्यांनी निस्वार्थीपणे देशसेवा केली आहे. मुखर्जी यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल आनंद होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

ग्रामीण विकासासाठी नानाजी देशमुख समर्पित होते. ग्रामीण भागातील जनतेला सशक्त करण्यासाठी त्यांनी आपले जीवन वेचले. त्यांची भारतरत्नासाठी केलेली निवड योग्य आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. याचबरोबर, भूपेन हजारिका यांच्या संगीताचे अनेक चाहते आहेत. भारतीय संगीततज्ज्ञ म्हणून त्यांची जगभर ख्याती आहे. हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न दिल्याबद्दल आनंद होत आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. 

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जी