शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

Bharat Bandh: बिहामधील गयामध्ये लाठीचार्ज, आरामध्ये गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 16:20 IST

शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधील जातीवर आधारित आरक्षणाविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनाला बिहारमध्ये हिंसक वळण आले आहे.

पाटणा: शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधील जातीवर आधारित आरक्षणाविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनाला बिहारमध्ये हिंसक वळण आले आहे. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उसळला असून अनेक भागांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्याचबरोबर, काही ठिकाणी हिंसक झालेल्या जनसमुदायाने जाळपोळदेखील केली आहे. बिहार येथील आरानगरमधील आनंदनगर परिसरात भारत बंदचे समर्थन आणि विरोध करणा-यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. तसेच, आरानगरमध्ये काही तरुणांनी पटना पॅसेंजर रेल्वे रोखून धरली. यावेळी तरुणांनी आरक्षणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, या आंदोलनादरम्यान सात जण जखमी झाले आहेत. काही आंदोलकांना पोलिसांनी अटक केली असून आरा परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. या शिवाय गयामध्ये आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. आरक्षणाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या काही तरुणांनी बिहारच्या भोजपूरमध्ये रस्ता रोखला आहे. याशिवाय अनेक ठिकाणी जाळपोळदेखील झाली आहे.  कैमूर जिल्ह्यातील नॅशनल हायवे २१९ वर आंदोलक तरुणांनी आरक्षणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन हायवे रोखला आहे. मुझफ्फरपूरमध्येही पाटणा हायवे रोखण्यात आला आहे. 

अॅट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेल्या बदलांविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या भारत बंद दरम्यान उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंसाचार झाला होता. याच बंदला उत्तर म्हणून जातीवर आधारित आरक्षणाविरोधात काही संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. अधिकृतपणे कोणत्याही मोठ्या संघटनेकडून जाहीरपणे भारत बंदची हाक देण्यात आलेली नाही. मात्र तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अफवा लक्षात घेता पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. 

 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद