‘राष्ट्रीय गं्रथ’ घोषित करा : सुषमा स्वराज यांच्या मागणीला तीव्र विरोध
नवी दिल्ली : भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करा, अशी मागणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी रेटताच विरोधाचे तीव्र सूर उमटले आहे. साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानाचे वादळ शमते ना शमते तोच गीतेवरून राजकीय महाभारत घडण्याचे स्पष्ट संकेत दिवसभराच्या घडामोडींनी दिले. गीतेला हा असा दर्जा देणो म्हणजे देशाचे धर्मनिरपेक्ष तत्त्वज्ञान गुंडाळून हिंदुराष्ट्राच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याची टीका त्यातून सुरू झाली आहे. मुख्य म्हणजे मग इतर धर्मातील पवित्र ग्रंथाचे काय, असा सवालही उपस्थित झाला आहे. तशात सोमवारीच ताजमहाल कोणाचा, असा प्रश्न उपस्थित झाला.
काय म्हणाल्या होत्या सुषमा स्वराज
रविवारी प्रेरणा महोत्सवाचे आयोजन केले होत़े या कार्यक्रमात स्वराज यांनी गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करण्याची मागणी पुढे रेटली होती़
जीवनातील सर्व समस्या आणि प्रश्नांची उत्तरे गीतेत आहेत़ जीवनाचे सार सांगणा:या या महान ग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा मिळायला हवा़
नरेंद्र मोदी यांनी बराक ओबामा यांना गीतेची प्रत भेट देऊन एकप्रकारे गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा अनौपचारिक दर्जा दिलेला आहेच, असे स्वराज म्हणाल्या होत्या़
गीतेसह कुराण, पुराण, वेद, वेदांत, बायबल, गुरुग्रंथसाहेब हे सर्व धर्मग्रंथ आमच्यासाठी पवित्र आहेत़ पण लोकशाही राज्यघटना हाच राष्ट्रीय आणि पवित्र गं्रथ असायला हवा़- ममता बॅनर्जी
तिरुकुरल हाच भारताचा राष्ट्रीय गं्रथ बनू शकतो़ हा ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करा.
-एस़ रामदास, पीएमके
तुम्ही गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करीत
असाल तर वेदांचे काय? उपनिषदांचे काय? भारतासारख्या बहुधार्मिक देशात एकच ग्रंथ पवित्र कसा ठरवला जाऊ शकतो? -शशी थरूर
आठवे आश्चर्य ताजमहाल कोणाच्या मालकीचा ?
जगातले आठवे मानवनिर्मित आश्चर्य म्हणून ओळखल्या जाणा:या ताजमहालवर मालकी कोणाची, असा प्रश्न सोमवारी लोकसभेत उपस्थित झाला. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तो त्यांचा असल्याचे तर विरोधी पक्षातील सदस्यांनी तो सर्वाचा असल्याचे उत्तर दिले. हा प्रश्न उपस्थित केला होता एआयएमआयएमच्या असदुद्दीन ओवेसी यांनी. अलीकडेच आजम खान यांनी ताजमहाल ही राज्य वक्फ मंडळाची संपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती.