अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टेरिफ लादले आहे. या विरोधात भारतात आंदोलने सुरु झाली असून मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये ट्रम्प यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. भारतीय गणवार्ता पार्टीने ट्रम्प यांच्या टेरिफला विरोध केला तसेच ट्रम्प यांच्या तेराव्याला या, असे निमंत्रण देणारी पत्रकेही वाटली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी मैत्रीच्या नावावर ट्रम्प यांनी गद्दारी केल्याचा आरोप या पक्षाने केला आहे.
ट्रम्प यांच्यामुळे भारताच्या जवळपास ५.४ लाख कोटींच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे, यामुळे मोठ्या संख्येने नोकऱ्या जाण्याचा धोका असल्याचा आरोप या पक्षाने केला आहे. यावेळी एका रस्त्यावर ट्रम्प यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच फ्लेक्सही लावण्यात आले होते. तेराव्या दिवशी लोकांना अंत्यसंस्काराचे जेवण दिले जाणार असल्याचे या पक्षाने जाहीर केले आहे.
ट्रम्प यांनी मैत्रीच्या नावाखाली विश्वासघात केला आहे. पाकिस्तानला दहशतवादासाठी प्रोत्साहन देत आहेत. आम्ही १३ दिवसांनी त्यांचे तेराव्या दिवसाचे विधी करू, असे भगवा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकांत शुक्ला यांनी सांगितले.