शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लढवणार राज्यसभेची निवडणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 21:41 IST

भारतीय जनता पार्टीचे राष्टीय अध्यक्ष अमित शहा राज्यसभेची निवडणूक लढविणार आहेत. बुधवारी झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

नवी दिल्ली, दि. 25 : भारतीय जनता पार्टीचे राष्टीय अध्यक्ष अमित शहा राज्यसभेची निवडणूक लढविणार आहेत. बुधवारी झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अमित शहा यांच्यासह केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री स्मृती इराणी  सुद्धा राज्यसभेची निवडणूक लढविणार आहेत. 

गुजरातमध्ये राज्यसभेसाठी तीन जागांसाठी येत्या आठ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत अमित शाह आणि स्मृती ईरानी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, मध्यप्रदेशातून राज्यसभेसाठी संपतिया उइके यांनी उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे वरिष्ठ नेता जे.पी. नड्डा यांनी संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर सांगितले. 

दरम्यान, गुजरात (3), पश्चिम बंगाल (6) आणि मध्यप्रदेशमधील (1) राज्यसभेच्या दहा जागांवर सद्या सर्वांचे लक्ष लागलेले आहे. याशिवाय उत्तरप्रदेशातील 2 आणि आंध्रप्रदेशातील एका जागेवरही राज्यसभेची पोटनिवडणूक होणार आहे. तसेच, बसपाच्या प्रमुख मायावती यांनी दिलेला राजीनामा आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर व्यंकय्या नायडू यांची एक जागाही रिक्त होईल. पंरतू, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भाजपाला राज्यसभेची जागा देतील का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर,भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे गुजरातमधील राज्यसभेच्या तीनही जागा मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसच्या 11 आमदारांनी भाजपासाठी क्रॉस वोटिंग केल्यानंतर अहमद पटेल यांच्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. गुजरात विधानसभेच्या 182 सदस्यात भाजपाचे 123 सदस्य आहेत. राज्यसभेसाठी त्यांचे दोन उमेदवार विजयी होऊ शकतात. काँग्रेसचे 56 सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे 2 तर जनता दल यूनायटेडचा एक सदस्य आहे. या पक्षांच्या पाठिंब्याने काँग्रेसचा एक सदस्य राज्यसभेसाठी निवडून येऊ शकतो. परंतू, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना अतिरिक्त 11 मते मिळाली. तसेच, शंकरसिंह वाघेला यांनी पक्ष सोडला आहे. या घटनांमुळे आता परिस्थिती बदलली आहे. काही बदल होऊ शकतो का याची चाचपणी काँग्रेस करत आहे.