शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

कर बुडवला असेल, तर सावधान! १०० अधिकाऱ्यांच्या टीमला ८ लाख काेटी रुपयांचे टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 06:25 IST

करवसुलीच्या मागील नोंदीवरून असे दिसून येते की, विभागाचे अधिकारी केवळ १० टक्के इतकीच  थकबाकी वसूल करू शकलेले आहेत

हरीश गुप्ता नवी दिल्ली : ३१ मार्च २०२३ पूर्वीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुमारे आठ लाख कोटी रुपयांची आयकर थकबाकी वसूल करण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालय सध्या अतिरिक्त काम करीत आहे. आयकर विभागाची एकूण थकबाकी १९ लाख कोटी रुपये असली तरी सरकारने या रकमेच्या किमान ४० टक्के वसूल करण्याचे लक्ष्य सध्या ठेवले आहे. मोदी सरकारने पुढील आर्थिक वर्षात देशभरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी दहा लाख कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तर अर्थ मंत्रालयाला जलद गतीने थकबाकी वसूल करण्यास सांगितले आहे. 

करवसुलीच्या मागील नोंदीवरून असे दिसून येते की, विभागाचे अधिकारी केवळ १० टक्के इतकीच  थकबाकी वसूल करू शकलेले आहेत. वसुलीची ही रक्कम आता ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने समोर ठेवले आहे. याच उद्देशाने करदात्यांनी दाखल केलेल्या अपिलांचा निपटारा करण्यासाठी आणि मोठी रक्कम थकीत असलेल्यांकडून वसूल करण्यासाठी जवळपास १००सह आयुक्त दर्जाचे अधिकारी तैनात केले जातील. त्यानुसार विभागाने तयारी सुरु केली आहे. 

करदात्यांना असे वाटते की, २०२१-२२पर्यंतचे १४.१९ लाख कोटी रुपये परत करावेत. गत पाच वर्षांत करवसुवलीसंदर्भात ५,९८,४४८ प्रकरणे दाखल आहेत. यातील ४,४०,१५३ अपिलांचे पाच वर्षांत निराकरण करण्यात आले आहे. मात्र, दोन लाखांपेक्षा अधिक अपील अद्याप आयुक्तांकडे प्रलंबित आहेत. वाटाघाटीतून हा प्रश्न सोडविण्याचा  केंद्र सरकार गंभीरपणे विचार करीत आहे. परंतु आयटी अधिकारी यासाठी इच्छुक नाहीत, असे दिसत आहे. कारण, करदात्यांना मदत केल्याप्रकरणी तपास यंत्रणांकडून भविष्यात त्यांचीच  विचारपूस होऊ शकते, अशी भीती विभागातील आयटी अधिकाऱ्यांना वाटते. 

कर थकबाकी का वाढत आहे? प्रलंबित असलेले खटले, कंपन्यांचे लिक्विडेशन, विविध पद्धतींचा वापर करूनही शोधता न येणारे करदाते यामुळे कर थकबाकी वाढत आहे. न्यायालये किंवा न्यायाधिकरणांनी स्थगिती दिलेली प्रकरणेही आहेत. विरोधाभास असा आहे की, आयटी विभागातही अनेक अपील आहेत. 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सCentral Governmentकेंद्र सरकार