शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

BSFच्या युनिफॉर्ममध्ये शहिदाच्या पत्नीची फसवणूक, 8 लाखांची लूट करून चोर परागंदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 17:36 IST

मध्य प्रदेशमध्ये एका चोरानं शहीद जवानाच्या पत्नीला फसवून 8.50 लाख रुपये लंपास केले आहेत.

भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये एका चोरानं शहीद जवानाच्या पत्नीला फसवून 8.50 लाख रुपये लंपास केले आहेत. आरोपीनं बीएसएफचा युनिफॉर्म परिधान केला होता अन् महिलेला फसवलं. पैसे लुटण्यासाठी चोरानं वापरलेली ही युक्ती महिलेच्याही लक्षात आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये 2013ला एक दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ओमप्रकाश मर्दानिया हा जवान शहीद झाला होता. त्यानंतर आता चोरानं त्याची पत्नी कोमल मर्दानिया यांना ठकवलं. बीएसएफच्या युनिफॉर्ममध्ये आलेल्या चोरानं कोमलला बोलण्यात गुंतवून त्यांच्या खात्यातून 8 लाख रुपये वळते केले.बीएसएफच्या युनिफॉर्ममध्ये आलेल्या चोरानं कोमलला भूल देऊन त्यांच्या खात्यातून 8 लाख रुपये काढल्यानंतर पोबारा केला. चोरांनी त्या महिलेच्या नातेवाईकाची एक बाईकही पळवली. त्यानंतर लागलीच त्या शहिदाच्या पत्नीनं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. ती म्हणाली, शहीद पतीचे पीएफ आणि इतर सहाय्यता निधी मिळून माझ्या खात्यात 35 लाख रुपये जमा करायचे आहेत, असे चोरांनी सांगितलं. त्यामुळेच मी त्या चोरांना माझ्या खात्यासंदर्भात माहिती दिली. तसेच पती शहीद झाल्यानंतर आलेले पैसे मी मुलांच्या खात्यात जमा केले होते. हे पैसेसुद्धा मी मुलांच्या खात्यात जमा करणार होती.परंतु त्या चोरानं मला सासू आणि मुलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास मज्जाव केला आणि सांगितलं की, तुमच्या खात्यात 35 लाख रुपये जमा होतील. आपल्याला फक्त 8.50 लाख रुपये काढून सासूच्या एसबीआय बँकेत टाकावे लागणार आहेत. पैसे काढल्यानंतर आरोपीनं ते स्वतःजवळ ठेवले. त्यानंतर त्या चोरानं मृत्यू प्रमाणपत्र आणि शपथपत्र बनवण्यासाठी जात असल्याचं सांगत तो मोटारसायकलवरून फरार झाला. चोर परत न आल्यानं कोमलला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि तिने पोलिसांत जाऊन याची तक्रार दिली. 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दल