शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जी यांच्यासह ३ नेत्यांना राज्यपालांनी ४४ कोटींची पाठवली नोटीस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:59 IST

राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कुणाल घोष आणि तृणमूल काँग्रेसच्या दोन आमदारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे.

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि राज्यपाल यांच्यातील वादविवाद वाढला आहे. राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कुणाल घोष आणि तृणमूल काँग्रेसच्या दोन आमदारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. दरम्यान, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि आमदारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. 

राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांची मानहानी केल्याप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कुणाल घोष यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदार सयंतिका बॅनर्जी आणि रैयत हुसैन सरकार यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच, जर या संदर्भात तात्काळ माफी मागितली नाही तर त्यांच्यावर प्रत्येकी ११ कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला जाईल, असे नोटिसीत म्हटले आहे.

काय आहे प्रकरण? गेल्या वर्षी मे २०२४ मध्ये पश्चिम बंगालच्या २ विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी, बारानगर मतदारसंघातून सयंतिका बॅनर्जी आणि भगवान गोला मतदारसंघातून रैयत हुसैन सरकार विजयी झाले. या दोन्ही आमदारांच्या शपथेबाबत वाद निर्माण झाला होता. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांना शपथ देण्याचा अधिकार दिला नाही. तर राज्यपालांनी उपसभापतींनी दोघांनाही शपथ द्यावी, असे सांगितले.

मात्र, दोन्ही आमदारांनी राजभवनात जाऊन शपथ घेण्यास नकार दिला. या आमदारांनी सांगितले होते की, राजभवन सुरक्षित नाही. या संपूर्ण घटनेवरून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजभवनाबद्दल गंभीर टिप्पणी केली होती. ममता बॅनर्जी  म्हणाल् होत्या की, राजभवनात महिला सुरक्षित नाहीत. दरम्यान, असे म्हटले जात आहे की, दोन्ही आमदारांनी राज्यपालांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल