शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपसोबत १००० कोटींची डील अन् उपमुख्यमंत्री पदाची ऑफर; व्हायरल व्हिडिओने बंगालमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:41 IST

आम जनता उन्नयन पार्टीचे अध्यक्ष हुमायूं कबीर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Humayun Kabir: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असतानाच एका व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. आम जनता उन्नयन पार्टीचे अध्यक्ष हुमायूं कबीर हे भाजप नेत्यांसोबत १००० कोटी रुपयांच्या डीलवर चर्चा करत असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे. या व्हिडिओमध्ये कबीर यांनी ममता बॅनर्जींना सत्तेतून हटवण्यासाठी भाजपशी हातमिळवणी केल्याचे आणि उपमुख्यमंत्री पदाची मागणी केल्याचे दिसत आहे.

व्हिडिओमध्ये नेमके काय आहे?

१९ मिनिटांच्या या कथित व्हिडिओमध्ये हुमायून कबीर यांनी धक्कादायक दावे केले आहेत. "ममता बॅनर्जींना कोणत्याही परिस्थितीत सत्तेतून खाली खेचायचे आहे. जर माझ्या ६०-७० जागा निवडून आल्या, तर मी उपमुख्यमंत्रीही होऊ शकतो," असे कबीर व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत. तसेच, बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्याशी आपली चर्चा झाली असून, त्यांनी दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाशी भेट घालून देण्याचे आश्वासन दिल्याचेही कबीर यांनी म्हटले. धक्कादायक म्हणजे, या संपूर्ण रणनीतीसाठी भाजपसोबत १००० कोटींची डील झाल्याचा उल्लेखही यात आहे.

तृणमूलची 'ईडी' चौकशीची मागणी

टीएमसी नेते कुणाल घोष यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन या व्हिडिओवर हल्लाबोल केला. हुमायूं कबीर हे सुवेंदू अधिकारी, पंतप्रधान कार्यालय , मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या संपर्कात आहेत. जर यात पैशांच्या व्यवहाराचा उल्लेख असेल, तर ईडी गप्प का आहे? असा सवाल घोष यांनी विचारला आहे. भाजप बी टीम आणि सी टीमच्या माध्यमातून मुस्लिम आणि हिंदू मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही टीएमसीने केला.

हा तर एआय चा खेळ; कबीर यांचा पलटवार

स्वतःवर होणारे सर्व आरोप हुमायून कबीर यांनी फेटाळून लावले आहेत. "हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) च्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. टीएमसी मला बदनाम करण्यासाठी हे जाळे रचत आहे. मी हिमंता बिस्वा सरमा किंवा मोहन यादव यांना कधीही भेटलेलो नाही," असे स्पष्टीकरण कबीर यांनी दिले. तसेच, हे आरोप सिद्ध न झाल्यास २००० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकीही त्यांनी दिली.

ओवैसींची एआयएमआईएम आघाडीतून बाहेर

या वादाचा सर्वात मोठा फटका हुमायूं कबीर यांच्या आघाडीला बसला. असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआईएमने कबीर यांच्या पक्षाशी असलेली युती तोडली आहे. "मुस्लिमांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या कोणत्याही विधानाशी आमचा पक्ष सहमत नाही," असे सांगत ओवैसींनी बंगालमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केली.

निवडणुकीवर काय परिणाम होणार?

हुमायूं कबीर यांची पार्टी २९४ पैकी ११८ जागांवर निवडणूक लढवत आहे. मुर्शिदाबाद आणि मालदा यांसारख्या मुस्लिम बहुल भागात कबीर यांचा प्रभाव आहे. बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Bengal: TMC alleges BJP deal with Humayun Kabir, stirs controversy.

Web Summary : TMC alleges Humayun Kabir's BJP deal for 1000 crores and Deputy CM post. Kabir denies it, calling it AI manipulation. AIMIM broke alliance. Controversy erupts before Bengal polls.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६tmcठाणे महापालिकाBJPभाजपा