शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 06:22 IST

राजकारण तापले; ममता बॅनर्जी यांचा आरोप, अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य केले

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये  विशेष सखोल पुनरिक्षणादरम्यान अर्थात एसआयआर प्रक्रियेनंतर तब्बल ९१ लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यादीतून मुद्दाम अल्पसंख्याक समाजातील नावे हटवण्यात आल्याचा आरोप केला.

ऑक्टोबर २०२५ अखेरीस राज्यात सुमारे ७.६६ कोटी मतदार होते. त्यापैकी सुमारे ११.८५ टक्के नावे वगळली गेली, ही मोठी टक्केवारी मानली जाते. अंतिम अद्ययावत मतदारसंख्या अद्याप अधिकृतरीत्या जाहीर व्हायची आहे. एसआयआर ही मतदार यादी शुद्ध करण्यासाठीची प्रक्रिया आहे. यामध्ये मृत व्यक्तींची नावे, स्थलांतरित मतदार, एकाच व्यक्तीची एकापेक्षा जास्त नावे, अपात्र नागरिक यांची तपासणी केली जाते.

मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक ठेवणे, हा या प्रक्रियेचा उद्देश असतो. मात्र, याच प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर नावे वगळली गेल्याने वाद निर्माण झाला आहे.न्यायालयीन छाननी निर्णायक टप्पा एसआयआर प्रक्रियेनंतर सुमारे ६०.०६ लाख मतदारांची प्रकरणे ‘छाननी’साठी ठेवण्यात आली. त्यातील २७.१६ लाख नावे वगळली गेली. म्हणजेच, छाननीत ४५.२२ टक्के प्रकरणांमध्ये नावे वगळण्याची कारवाई करण्यात आली. ३२.६८ लाख नावे कायम ठेवण्यात आली आहेत. 

मतदार यादी ‘फ्रीझ’; आता बदल शक्य नाहीत

निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यासाठी मतदार यादी नियमांनुसार ‘फ्रीझ’ केली आहे. त्यामुळे आता यात बदल करणे शक्य होणार नाही. यानंतर नवीन नावे समाविष्ट केली जाणार नाहीत, त्यामुळे नाव वगळलेल्या मतदारांसाठी ही मोठी अडचण ठरू शकते. ज्यांची नावे वगळली गेली आहेत, त्यांना न्यायाधिकरणाकडे अपील करण्याची संधी आहे. हे न्यायाधिकरण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आले आहे. मात्र, न्यायाधिकरणाकडून नाव परत मिळाले तरी त्या मतदाराला आगामी निवडणुकीत मतदान करता येईल का, याबाबत अजून स्पष्टता नाही.

ममतांची प्रक्रियेवर शंका

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी आरोप केला की, विशिष्ट समुदायांच्या लोकांची नावे लक्ष्य करून वगळली जात आहेत. त्यांच्या मते, त्यांच्या हस्तक्षेपानंतर ३२ लाख नावे पुन्हा समाविष्ट करण्यात आली, हा मुद्दा आता राजकीय रंग घेत असल्याचे दिसते.

English
हिंदी सारांश
Web Title : Bengal Voter List 'Clean-up': 9.1 Million Names Removed Before Election

Web Summary : West Bengal removed 9.1 million voters after a special revision. Mamata Banerjee alleges targeted deletion of minority names. The list is now frozen, hindering new inclusions, though appeals are possible. Concerns arise over fairness.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Mamata Banerjeeममता बॅनर्जीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदानElectionनिवडणूक 2026