शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘बेजबाबदार’ म्हटल्याने भडकले श्री श्री रविशंकर

By admin | Updated: April 21, 2017 02:02 IST

‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ने गेल्या वर्षी अतिभव्य प्रमाणावर आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या विश्व संस्कती महोत्सवामुळे यमुना नदीपात्राची झालेली हानी भरून देण्यावरून या संस्थेचे

नवी दिल्ली: ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ने गेल्या वर्षी अतिभव्य प्रमाणावर आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या विश्व संस्कती महोत्सवामुळे यमुना नदीपात्राची झालेली हानी भरून देण्यावरून या संस्थेचे संस्थापक व अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) यांच्यात गुरुवारी शाब्दिक खडाजंगी झाली.न्यायाधिकरणाने ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ला बेजबाबदार म्हटल्यानंतर रविशंकर यांनी यमुनेच्या पावित्र्याची व स्वच्छतेची एवढी काळजी होती तर मुळात कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशाला,असा सवाल उपस्थित केला.दिल्ली प्रशासन आणि दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिल्यानंतर ऐनवेळी हे प्रकरण आले तेव्हा ‘एनजीटी’नेही कार्यक्रमाला नाईलाजाने सशर्त परवानगी दिली होती. नदीपात्राची जी हानी होईल त्याची भरपाई करण्याचे वचन घेऊन अंतरिम भरपाई म्हणून पाच कोटी रुपये जमा करण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली होती.कार्यक्रम उरकल्यावर नदीपात्राच्या झालेल्या हानीचा अंदाज घेऊन ते पूर्वस्थितीत आणण्यासाठी करव्या लागणाऱ्या संभाव्य खर्चाचा अदमास करण्यासाठी ‘एनजीटी’ने एक तज्ज्ञ समिती नेमली होती. या समितीने १३.२९ कोटी रुपये खर्चाचा अंदाज दिला व कार्यक्रमामुळे नदीपात्राची हानी झाल्याचाही निष्कर्ष काढला. समितीचा हा अहवाल गेल्या महिन्यात न्यायाधिकरणाकडे सादर झाला.कार्यक्रमामुळे नदीपात्राची कोणतीही हानी झालेली नाही व हे आम्हाला बदनाम करण्याचे कारस्थान आहे, अशी भूमिका ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ने घेतली. स्वत: श्री श्री रविशंकर असेही म्हणाले की, यमुनेची आणि पर्यावरणाची एवढी काळजी होती तर मुळात परवानगीच द्यायची नव्हती. पण तुम्ही ती दिलीत त्यामुळे नदीपात्राची हानी झालीच असेल तर त्याबद्दल ज्यांनी परवानगी दिली, त्यांना दंड करावा.मूळ याचिकाकर्त्याने ही विधाने न्यायाधिकरणाच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणली. त्यावर न्यायपीठावरील सदस्यांनी ही विधाने धक्कादायक असल्याचे म्हटले व आर्ट आॅफ लिव्हिंग किंवा रविशंकर यांचा नावानिशी उल्लेख न करता असेही तोडी भाष्य केले की, तुम्हाला जबाबदारीचे काही भान नाही. मनाला येईल ते बोलण्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे, असे समजता की काय?याची रीतसर दखल घेता यावी यासाठी याचिकाकर्त्याने औपचारिक अर्ज करावा, असे सांगून न्यायाधिकरणाने पुढील सुनावणी ९ मे रोजी ठेवली. (लोकमत न्यूज नेटवर्क)