शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

दे घुमा के... सुषमा स्वराज यांचा पाकिस्तानवर 'स्ट्राईक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 11:49 IST

एअर स्ट्राइकनंतरच्या घडामोडीवरुन पाकिस्तानला सवाल

गाझियाबाद: भारतीय हवाई दलानं बालाकोटमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याला पाकिस्ताननं दिलेल्या प्रत्युत्तरावरुन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सवाल उपस्थित केला आहे. भारतानं जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ले होते. मग पाकिस्ताननं जैशच्या वतीनं भारताला प्रत्युत्तर दिलं का, असा प्रश्न स्वराज यांनी विचारला. आमच्या हवाई दलानं एअर स्ट्राइक करताना त्यांच्या नागरिकांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. त्यांच्या सैन्यावरही हल्ला करण्यात आला नाही. मग पाकिस्ताननं दुसऱ्या दिवशी हल्ला का केला? त्यांनी जैशच्या वतीनं प्रत्युत्तर दिलं का?, असे प्रश्न स्वराज यांना पाकिस्तानला विचारले आहेत. त्या भाजपाच्या गाझियाबादमधील संकल्प सभेत बोलत होत्या. 'पुलवामा हल्ल्यानंतर भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा पाठिंबा मिळाला. आपण युद्ध करू, अशी भीती पाकिस्तानला होती. त्यांनी मदतीसाठी अनेकांना फोन केले. भेटीगाठी घेतल्या. पण आपण एक जबाबदार आणि शांतताप्रिय राष्ट्र आहोत. त्यामुळे आपण परिस्थिती बिघडू दिली नाही. मात्र पाकिस्ताननं पुन्हा आगळीक केल्यास आम्ही शांत बसणार नाही,' असा अप्रत्यक्ष इशारा स्वराज यांनी पाकिस्तानला दिला. गाझियाबादमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या प्रचारसभेला आलेल्या स्वराज यांनी उपस्थितांना संबोधित केलं. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर करण्यात आलेला एअर स्ट्राइकचा उल्लेख करत स्वराज यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतलं. '2008 मध्ये देशावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी तत्कालीन सरकारनं आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा घ्यायला हवा होता. पाकिस्तानला एकाकी पाडायला हवं होतं. मात्र त्यांनी संधी गमावली,' अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाSushma Swarajसुषमा स्वराजPakistanपाकिस्तान