शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

दिल्ली विद्यापीठात चक्क 'बिअर'चं झाड, रोज मिळते 10 लिटर बिअर

By admin | Published: March 24, 2017 6:18 AM

येथे अनेकदा बिअर पिण्यासाठी मोठी झुंबड उडते, मोठी रांग लांगलेली असते. गेल्या अनेक महिन्यांपासून या झाडातून रोज 10 लिटर बिअर निघत आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - दिल्ली विद्यापीठाच्या(डीयू) नॉर्थ कॅम्पसमधून एक अचंबित करणारी घटना समोर आली आहे. येथे असलेल्या कडुनिंबाच्या झाडातून बिअरची चव असलेलं द्रव बाहेर येत आहे. 'निम बिअर' म्हणून लोकंही ते आवडीने पित असून कॅम्पसच्या बाहेरुनही लोकं येथे निम बिअर पिण्यासाठी येत असल्याचं कॅम्पसमधील मुख्य माळी महेश प्रसाद यांनी सांगितलं. 
 
'या झाडातून पांढ-या रंगाचं रस बाहेर पडत असून बिअर प्रमाणेच त्याची नशा आहे. गेल्या वर्षीपासून हा प्रकार सुरू आहे' असं प्रसाद यांनी सांगितलं. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.  या वृत्तानुसार गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून या झाडातून निम बिअर बाहेर पडत आहे. येथे अनेकदा बिअर पिण्यासाठी मोठी झुंबड उडते, मोठी रांग लांगलेली असते. गेल्या अनेक महिन्यांपासून या झाडातून रोज 10 लिटर बिअर निघत आहे. एकही थेंब वाया जाऊ नये यासाठी कोणीतरी ज्या फांदीतून पांढरा रस बाहेर येत आहे तेथे बादली बांधून ठेवली आहे, तर एक व्यक्ती झाडावर चढून बाटलीत भरून बिअर देत असतो.
विशेष म्हणजे कॅम्पसमध्ये 50 वर्षांहून जुनी अशी 15 कडुनिंबाची झाडं आहेत, पण अशा प्रकारचा द्रव केवळ या एकाच झाडातून येत आहे. दिल्लीतील अशाप्रकारची ही पहिलीच घटना असल्याचं दिल्ली विद्यापीठात 'एनव्हायरनमेंट मॅनेजमेंट ऑफ डीग्रेडेड इकोसिस्टम्स'चे प्राध्यापक सी.आर. बाबू म्हणाले. डीयूच्या 'एनव्हायरनमेंट स्टडीज' विभागाकडून यावर अभ्यास सुरू करण्यात आला आहे.   
त्या द्रवात काही औषधी गुण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर ते झाड रोगी असून त्यातून येणारं द्रव हानीकारक ठरू शकतं अशाही प्रतीक्रीया उमटत आहेत.