बेदी व केजरीवाल संधीसाधू- माकन
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
नवी दिल्ली-आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल व भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी हे दोघे संधीसाधू असल्याचे मत काँग्रेस नेते अजय माकन यांनी व्यक्त केले आहे. या दोघांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी अण्णा हजारे यांचा वापर केल्याचे त्यांनी पुढे म्हटले.
बेदी व केजरीवाल संधीसाधू- माकन
नवी दिल्ली-आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल व भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी हे दोघे संधीसाधू असल्याचे मत काँग्रेस नेते अजय माकन यांनी व्यक्त केले आहे. या दोघांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी अण्णा हजारे यांचा वापर केल्याचे त्यांनी पुढे म्हटले. काँग्रेस निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख असलेल्या माकन यांनी पुढे, हे दोन्ही नेते संधीसाधू शक्तींचे प्रतिनिधित्व करतात. दोघांनी पुढे येण्यासाठी अण्णा व त्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्याचा वापर केला. याआधी ते एका स्वयंसेवी संघटनेच्या आडून काम करीत होते आता ते आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करू इच्छितात. बेदी या भूतकाळात चांगल्या पोलीस अधिकारी होत्या. मात्र राजकारण व प्रशासनात वेगळ्या क्षमतांची गरज असते. धैर्याची गरज असते. तुम्हाला सगळ्यांचे ऐकून घ्यावे लागते. मात्र त्या चांगल्या श्रोता नाहीत असे उत्तर त्यांनी एका प्रश्नाला दिले. माकन हे सदर बाजार मतदारसंघातून आपला निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. याआधी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ यांच्यावर शरसंधान करताना त्याही संधीसाधू आहेत असे म्हटले आहे.