शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

'सहाव्यांदा MP झालोय, आपण मला शिकवाल...'? घोषणाबाजीपासून रोखल्यानं पप्पू यादव यांचा भाजप खासदारावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 20:35 IST

दरम्यान, बिहारमधील पूर्णिया येथून विजयी झालेले पप्पू यादव यांनीही शपथ घेतल्यानंतर, काही घोषणा देण्याचा प्रयत्न केला असता, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि प्रोटेम स्पीकर यांनी त्यांना रोखले. यावरून यादव यांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांकडे बघत निशाणा साधला. 

लोकसभेमध्ये नवनिर्वाचित खासदारांची शपथ घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातच असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यांमुळे वाद निर्माण झाला. यानंतर लोकसभेच्या रेकॉर्डवरून संबंधित वादग्रस्त विधाने आणि घोषणा हटविण्यात आल्या. दरम्यान, बिहारमधील पूर्णिया येथून विजयी झालेले पप्पू यादव यांनीही शपथ घेतल्यानंतर, काही घोषणा देण्याचा प्रयत्न केला असता, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि प्रोटेम स्पीकर यांनी त्यांना रोखले. यावरून यादव यांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांकडे बघत निशाणा साधला. 

सत्ताधारी पक्षाच्या खासदाराकडे बघत निशाणा साधताना पप्पू यादव म्हणाले, "मी 6 व्यांदा खासदार झालो आहे. आपण मला शिकवणार?' शपथ घेण्यासाठी पोहोचलेल्या पप्पू यादव यांच्या गळात #Reneet असे लिहिलेली एक चिठ्ठी दिसून आली. त्यांनी आपल्या शपथेची सुरवात, 'प्रणाम पूर्णिया, प्रणाम बिहार, सलाम बिहार, जोहार बिहार' ने केली

भोजपुरी भाषेतून शपथ, नंतर घोषणाबाजी -पप्पू यादव यांनी भोजपुरी भाषेतून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर धन्यवाद म्हणताना त्यांनी, नीट परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली. याच बरोबर त्यांनी बिहारला विशेष दर्जा देण्याचीही मागणी केली. तसेच त्यांनी सीमांचल झिंदाबाद, मानवतावाद झिंदाबाद अशा घोषणा दिल्या. यावर प्रोटेम स्पीकर आणि संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांना घोषणाबाजी थांबवण्यास सांगितले.

'आपण कृपेने जिंकले असाल, मी अपक्ष विजयी झालो आहे' -यावर पप्पू यादव म्हणाले, मी 6 वेळा खासदार म्हणून निवडून आलो आहे. आपण मला शिकवाल? तसेच, पप्पू यादव सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडे इशारा करत म्हणाले, 'आपण कृपेने जिंकला असाल, मी अपक्ष विजयी झालो आहे.' मी चौथ्यांदा अपक्ष निवडणूक जिंकून आलो आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाBiharबिहारParliamentसंसद