शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनी बनला प्रामाणिक, परत केले चोरलेले पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 02:06 IST

आपल्या अमली पदार्थाच्या व्यसनाची जाणीव झाल्यानंतर सुधारणा झालेल्या एकाने काही वर्षांपूर्वी ज्या महिलेचे पाकीट (वॉलेट) चोरले होते तिचा शोध घेऊन काही रक्कम

आपल्या अमली पदार्थाच्या व्यसनाची जाणीव झाल्यानंतर सुधारणा झालेल्या एकाने काही वर्षांपूर्वी ज्या महिलेचे पाकीट (वॉलेट) चोरले होते तिचा शोध घेऊन काही रक्कम परत केली व पत्र लिहून खेद व्यक्त केला. फेसबुकवर अ‍ॅमी ख्रिस्तीन या महिलेने १४० डॉलरचे (१०७ पौंड) छायाचित्र पत्रासह टाकले व त्यात लिहिले : ‘‘ओहो, मला तर सध्या धक्काच बसला आहे. काही वर्षांपूर्वी मी पबमध्ये असताना माझे वॉलेट चोरीला गेले होते. मी घरी आल्यावर वॉलेट हरवल्याचे माझ्या लक्षात आले. सगळीकडे शोध घेतला व पबमध्येही फोन केला परंतु ते सापडले नाही. कोणी तरी रात्री आमच्या मोलकरणीकडे एक पाकीट देऊन गेले. माझा शोध घेण्यासाठी कोणी एवढे प्रयत्न केले आहेत यावर माझा विश्वास बसत नाही. अनोळखी गृहस्था, तुझे खूप आभार. माझे डोळे पाणावले आहेत.’’ त्याने पत्रात म्हटले की : ‘‘सुमारे साडेपाच वर्षांपूर्वी मी तुमच्याबाबत फारच भयंकर वागलो. मी तुमचे वॉलेट लांबवले. मला अमला पदार्थांचे व्यसन आहे. हा नाद पूर्ण करण्यासाठी मला जेथून कुठून पैसे मिळतील तेथून हवे असायचे. मी तुम्हाला ओळखतही नाही. वॉलेटमधील बेस्ट बायचे कार्ड आणि रोख रक्कम मी घेतली व वॉलेट फेकले. नंतर मला उपचार घ्यावे लागले व मी मवाळ बनलो. जुन्या वस्तुंमध्ये तुमचे बेस्ट बायचे कार्ड मला साडपले. तुमचे नाव त्यावर पाहिले व तुम्ही कुठे कामाला आहात ते शोधले. एवढी वर्षे तु्म्हाला जो मनस्ताप भोगावा लागला त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. माझ्याकडून जे झाले ते अक्षम्यच आहे, परंतु तुम्हाला छोटीशी का असेना रक्कम परत करायला मला आवडेल. यापुढे मी कधीही कोणाला अशा पद्धतीने दुखावणार नाही.’’