शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Science News: विज्ञानही झुकले! वयाच्या 70 व्या वर्षी बनली आई; गुजरातच्या दांम्पत्याला 45 वर्षांनी मुल झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 19:14 IST

IVF Success Story in Gujrat: जीवूबेन या जगातील सर्वात वयस्कर माता असल्याचा दावा केला आहे. 2009 मध्ये जगातील सर्वात वयस्कर माता बनण्याचे रेकॉर्ड युरोपच्या एलिजाबेथ एडिनीच्या नावे होते.

अहमदाबाद : आई होणे हे सर्व महिलांसाठी भाग्याचे असते. अनेकांना व्यंधत्व किंवा अन्य काही कारणांमुळे मूल होत नाही. यामुळे समाजातून, घरातून त्यांना टोमणे ऐकावे लागतात. गुजरातमध्ये एक आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. एका 70 वर्षीय महिलेची 45 वर्षांपासून आई होण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. जगातील सर्वाधिक वयात ती आई झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 

70 वर्षीय जीवूबेन राबरीने 45 वर्षांनी मुलाला जन्म दिला आहे. वाचून आश्चर्य वाटले असेल. पण हे खरे आहे. गुजरातमध्ये सध्या जीवूबेन आणि तिचा पती मालधारी (75) हे चर्चेचा विषय बनले आहेत. दोघांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचा मुलगा दाखविला आहे. दांम्पत्याने आयव्हीएफद्वारे मुलाला जन्म दिला आहे. ते कच्छच्या छोट्याशा गावात मोरामध्ये राहणारे आहेत. एवढ्या वर्षांनी पाळणा हलल्याने कुटुंब आणि नातेवाईकांत आनंदाचे वातावरण आहे. माता आणि मुलगा दोन्ही स्वस्थ आहेत. 

जीवूबेन आणि मालधारी यांचे लग्न 45 वर्षांपूर्वी झाले होते. मात्र, त्यांना मूल झाले नव्हते. आयव्हीएफ करणारे  डॉ. नरेश भानुशाली यांनी त्यांना या वयात आयव्हीएफद्वारे मूल जन्माला घालण्यातील अडचणी, धोके सांगितले होते. मुलाला जन्म देणे कठीण असल्याचे म्हटले होते. मात्र, दांम्पत्याने विज्ञानावर विश्वास ठेवला आणि अशक्य गोष्ट शक्य केली. 

जगातील सर्वात वयस्कर माता...जीवूबेन या जगातील सर्वात वयस्कर माता असल्याचा दावा केला आहे. 2009 मध्ये जगातील सर्वात वयस्कर माता बनण्याचे रेकॉर्ड युरोपच्या एलिजाबेथ एडिनीच्या नावे होते. तिने 50 वर्षांपेक्षा जास्त वयात मुलाला जन्म दिला होता. युकेमध्ये 50 पेक्षा जास्त वयात आयव्हीएफ करण्यावर बंदी होती. यामुळे तिला युक्रेनला जावे लागले होते.  

टॅग्स :Gujaratगुजरात