शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या घरी महिला खासदाराला मारहाण? स्वाती मालीवाल यांचा पोलिसांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 08:40 IST

मुख्यमंत्री केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :आप’च्या राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याच्या वृत्ताचे गौडबंगाल दिवसभर कायम राहिले. कथित मारहाणीच्या वृत्तानंतर खुद्द मालीवाल दिल्लीच्या सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात पोहोचल्या, पण कोणतीही तक्रार न नोंदविता त्या निघून गेल्या. या प्रकरणी आतापर्यंत कोणतीही तक्रार नोंदविण्यात आलेली नसल्याचे उत्तर दिल्लीचे पोलिस उपायुक्त मनोज मीणा यांनी म्हटले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. तेथील कर्मचाऱ्यांनी मालीवाल यांना भेटीस मज्जाव केला आणि केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभवकुमार यांनी मारहाण केली, असा दावा मालीवाल यांनी केला आहे. 

नेमके काय घडले? 

- स्वाती मालीवाल या सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी मुख्यमंत्री निवासस्थानी गेल्या हाेत्या. त्यांना अरविंद केजरीवाल यांना भेटायचे हाेते. 

- मात्र मालीवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांनी भेटू दिले नाही. त्यानंतर मालीवाल यांनी ९.३४ वाजता नियंत्रण कक्षाला काॅल केला. त्याची दखल घेत स्थानिक ठाण्याचे पाेलिस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. 

मालीवाल यांच्यावर भाजपचे प्रश्नचिन्ह

केजरीवाल यांना अटक झाली, तेव्हा मालीवाल भारतात नव्हत्या आणि बरेच दिवस त्या भारतात परतल्याही नाहीत. त्यांच्या अटकेवर मालीवाल यांनी मौन बाळगले होते, याकडे लक्ष वेधत भाजपच्या आयटी सेलचे प्रमुुख अमित मालवीय यांनी आम आदमी पार्टीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे सूचित केले आहे.

टॅग्स :AAPआपAam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल