शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! मोबाईल अ‍ॅपवरून झटपट कर्ज घेताय? RBI चा मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 21:46 IST

RBI Warning on Instant loan: रिझर्व्ह बँकेने नोंदणीकृत बँका आणि एनबीएफसीद्वारे डिजिटल कर्ज देण्याचे जे काम करतात त्यांना संबंधित वित्तीय संस्थांचे नाव ग्राहकांना स्पष्ट स्वरुपात सांगण्याचे आदेश दिले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने लोकांना अनधिकृत पद्धतीने डिजिटल प्लॅटफ़ॉर्मवर (digital lending platforms) तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे कर्जासाठी केलेला अर्ज यावरून सावध रहाण्यास सांगितले आहे. आरबीआयने बुधवारी एक प्रसिध्दी पत्रक जारी करत सांगितले की, लोक आणि छोटे व्यावसायिक पटकन मिळणाऱ्या आणि कोणत्याही कटकटीशिवाय मिळणाऱ्या कर्जाच्या आमिषाला बळी पडू लागले आहेत. 

अती व्याजदर आणि मागील दरवाज्याने जास्त पैसे उकळले जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे. याशिवाय वसुलीसाठी हे अ‍ॅप जबरदस्ती आणि कठोर उपाय करू लागले आहेत. हे स्वीकारार्ह नाही. तसेच हे अ‍ॅप कर्जदारांच्या मोबाईल नंबरचा दुरुपयोग करू लागले आहेत. लोकांना हा सल्ला आहे की त्यांनी अशा कोणत्याही भ्रामक प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच जर कर्ज घेत असतील तर त्या अ‍ॅपची आधी चांगल्या प्रकारे चौकशी करावी. 

याचबरोबर आधार कार्ड, पॅन कार्डसह तुमची माहिती, केवायसी कोणत्याही अज्ञात लोकांसोबत किंवा अनधिकृत अ‍ॅपवर देऊ नये. त्यांनी अशाप्रकारच्या अ‍ॅपबाबत संबंधित बँक किंवा कायदेशीर प्राधिकरणाला याची माहिती द्यावी. याबाबतची तक्रार https:achet.rbi.org.in वर केली जाऊ शकते. कायदेशीर रित्या कर्ज देण्याचे काम बँक किंवा एनबीएफसी करू शकतात, ज्या आरबीआयकडे रजिस्टर असतील. तसेच त्या राज्य सरकारांद्वारे नियमित केल्या असतील. 

रिझर्व्ह बँकेने नोंदणीकृत बँका आणि एनबीएफसीद्वारे डिजिटल कर्ज देण्याचे जे काम करतात त्यांना संबंधित वित्तीय संस्थांचे नाव ग्राहकांना स्पष्ट स्वरुपात सांगण्याचे आदेश दिले आहेत. या एनबीएफसींचे नाव आणि पत्ता आरबीआयच्या वेबसाईटवरून तपासता येणार आहे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र