शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

बंगालचा उपसागर संपर्क, समृद्धीचा सेतू व्हावा - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 07:01 IST

बिम्स्टेक शिखर परिषदेत मोदी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनदरम्यानच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह लागले असून, बिम्स्टेकच्या सदस्य देशांनी आपापसात सहकार्य वाढविण्यासोबत विभागीय सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच बंगालचा उपसागर हा संपर्क, समृद्धी आणि  सुरक्षेचा सेतू बनविण्याची हीच वेळ आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले. बहुक्षेत्रीय  तांत्रिक आणि आर्थिक सहयोगासाठी बंगाल उपसागराचा पुढाकार यावर डिजिटल माध्यमाने आयोजित पाचव्या शिखर परिषदेत ते बोलत  होते.

भारत, बिम्स्टेक सचिवालय संचालन अंदाजपत्रकासाठी १० लाख डॉलर देईल.  आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत हे क्षेत्र वेगळे नाही. जनता आजही कोविड-१९च्या सर्वव्यापी साथीचे परिणाम सोसत आहे, असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात  म्हणाले. रशिया - युक्रेन युद्धाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, युरोपातील अलीकडच्या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या स्थैर्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या विभागीय सुरक्षेला आणखी प्राधान्य देणे आवश्यक झाले आहे. या शिखर परिषदेतील निर्णय बिम्स्टेकच्या इतिहासात एक सुवर्ण अध्याय जोडेल. बिम्स्टेक सचिवालयाची क्षमता वाढविणे जरुरी आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालSea Routeसागरी महामार्ग