ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. १४ - समाजवादी पक्षातंर्गत गृहकलह अधिक तीव्र झाला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यातील मतभेदांची दरी अधिका रुंदावली आहे. समाजवादी पक्षाचे सुप्रीमे मुलायमसिंह यादव माझ्याबद्दल जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल कारण राज्यातील जनता नेताजी म्हणजेच मुलायमसिंहासोबत आहे असे शिवपाल यांनी बुधवारी सकाळी सांगितले.
अखिलेश यांनी शिवपाल यांच्या जवळची तीन महत्वाची खाती काढून घेतल्यानंतर शिवपाल यादव संतापले आहेत. मंत्रीपदाचा राजीनामा देणार का ? या प्रश्नावर मुलायम सिंहांसोबत चर्चा करुनच निर्णय घेईन असे उत्तर दिले. मागच्या काही महिन्यांपासून काका-पुतण्यामध्ये सुरु असलेले शीत युद्ध आता सार्वजनिक झाले आहे.
मुलायमसिंह यादव यांनी अखिलेश यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले व शिवपाल यांची नियुक्ती केली. त्यानंतर अखिलेश यांनी शिवपाल यांच्याजवळची महत्वाची खाती काढून घेतली. शिवपाल हा मुलायमसिंह यादव यांच्या सर्वाधिक निकट असलेला त्यांचा आवडता भाऊ आहे.