शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात घेतलेल्या 15 लाखाच्या अ‍ॅम्ब्युलन्सचा आता बुट सुकवण्यासाठी वापर, निघाली भंगारात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 13:20 IST

कोरोना काळात आरोग्य महासंचालनालयाकडून आलेली जवळपास १५ लाख रुपयांची नवी कोरी अ‍ॅम्ब्युलन्स विभागीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे भंगारात निघाली आहे.

बस्ती-

कोरोना काळात आरोग्य महासंचालनालयाकडून आलेली जवळपास १५ लाख रुपयांची नवी कोरी अ‍ॅम्ब्युलन्स विभागीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे भंगारात निघाली आहे. अत्याधुनिक सुविधांनी ही अ‍ॅम्ब्युलन्स सज्ज होती. पण प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अ‍ॅम्ब्युलन्सचा अजिबात वापर केला गेला नाही आणि ती अ‍ॅम्ब्युलन्स लाइफ सपोर्ट सिस्टमशी जोडण्यासाठीचं बजेट आणि सामान पाठवण्यात आलं नाही. 

जबाबदार अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अ‍ॅम्ब्युलन्सचं रजिस्ट्रेशन न झाल्यामुळे तिचा वापर करता आलेला नाही. जवळपास तीन वर्षांपूर्वी आरोग्य महासंचलनालयानं अ‍ॅम्ब्युलन्स बस्तीच्या आरोग्या विभागाला पाठवली होती. या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये अत्याधुनिक लाइफ सपोर्ट सिस्टम बसवलं जाईल असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. त्यासोबतच तिचा वापर १०८ क्रमांक डायल करण्याऐवजी आरोग्य अधिकारी आपल्या पातळीवर गरजूंना तातडीनं उपलब्ध करुन देण्यासाठी वापरतील असं ठरवण्यात आलं होतं. 

महत्वाची बाब म्हणजे या विभागासाठी वेगळं बजेट देखील मंजुर करण्यात आलं होतं. धक्कादायक बाब अशी की अ‍ॅम्ब्युलन्स रजिस्ट्रेशन न करताच पाठवण्यात आली होती. कोरोना काळात अशापद्धतीनं अत्याधुनिक फिचर्सनं सज्ज असलेल्या अ‍ॅम्ब्युलन्स जिल्ह्यांना पाठवण्यात आल्या होत्या. अ‍ॅम्ब्युलन्स आल्याच्या ६ महिन्यांनंतर गाडीचे चेसी नंबर मागवण्यात आले होते. जेणेकरुन वाहनांचं रजिस्ट्रेशन होऊ शकेल. पण बस्ती येथील या अ‍ॅम्ब्युलन्सचं रजिस्ट्रेशनच होऊ शकलेलं नाही. त्यासाठीचे कुणीच प्रयत्न केले नाहीत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या