शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

बर्फ हटवणे सुरू अन् कोसळला हिमकडा; उत्तराखंडमध्ये दुर्घटना, ५७ कामगार दबले, ३२ जणांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 06:33 IST

डेहराडून : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात माणा गावाजवळ रस्त्यांवर साचलेला बर्फ हटविण्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी आठ ...

डेहराडून : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात माणा गावाजवळ रस्त्यांवर साचलेला बर्फ हटविण्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हिमकडा कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखाली बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (बीआरओ) ५७ कामगार दबले गेले. त्यातील ३२ जणांचा जीव वाचविण्यात मदतयंत्रणांना यश आले आहे. अन्य ४१ कामगारांच्या सुटकेसाठी बचावकार्य वेगाने सुरू आहे.

चमोली, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, पिठोरागढ व बागेश्वर जिल्ह्यात २४०० मीटरपेक्षा उंच ठिकाणी हिमकडा कोसळण्याच्या दुर्घटना घडण्याचा इशारा चंडीगडमधील डिफेन्स जिओइन्फर्मेटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेन्ट या संस्थेने गुरुवारी संध्याकाळी दिला होता. तसेच या जिल्ह्यांतील ३५०० मीटर किंवा त्याहून अधिक उंचीवर असलेल्या ठिकाणी बर्फवृष्टी होण्याचा इशारा डेहराडून येथील वेधशाळेने दिला. त्यानुसार उत्तराखंडच्या आपत्कालीन यंत्रणेने संबंधित जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले होते. शुक्रवारी झालेल्या दुर्घटनेत माणा व बद्रीनाथ यांच्या दरम्यान असलेला बीआरओची एक छावणीदेखील हिमकड्याच्या ढिगाऱ्याखाली दबली असल्याचे चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

३२०० मीटर उंचीवर माणा हे भारत-तिबेट सीमावर्ती क्षेत्रातील अंतिम गाव आहे.

३ किमी अंतर दूर बद्रीनाथपासून.

दुर्घटनेविषयी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी मी चर्चा केली आहे. हिमकडा कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या सर्व कामगारांची सुटका करण्यासाठी मदतपथके सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

दबलेले कामगार कुठले?हिमकडा कोसळून दबलेल्यांमध्ये झारखंडमधील कामगार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले की, दुर्घटनास्थळी बीआरओ, आयटीबीपी व अन्य यंत्रणांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.

एनडीआरएफ मदतीलाराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) चार मदतपथके रवाना केली आहेत. त्यापैकी दोन पथके डेहराडूनमधील एनडीआरएफच्या क्षेत्रीय प्रतिसाद केंद्रातून (आरआरसी) तर उर्वरित दोन पथके जोशीमठ येथून पाठविण्यात आली. एनडीआरएफचे महासंचालक पीयूष आनंद यांनी सांगितले की, या चार पथकांव्यतिरिक्त आणखी चार पथके सज्ज ठेवली आहेत.

नेपाळमध्ये भूकंपाच्या धक्क्यांनी चार जखमीकाठमांडू/ पाटणा : नेपाळच्या सिंधुपालचौक जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे ६.१ रिक्टर स्केलचा भूकंप होऊन त्याचे धक्के काठमांडू तसेच अन्य ठिकाणी जाणवले. त्यामुळे झालेल्या दुर्घटनांत ४ जण जखमी झाले. त्याचवेळी भारतात बिहारमध्ये मुजफ्फरपूर, समस्तीपूर आणि इतर सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये ५.५ रिक्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. मात्र बिहारमध्ये कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. नेपाळमधील भूकंपाचा केंद्रबिंदू सिंधुपालचौक जिल्ह्यातील भैरवकुंडा येथे होता. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड