शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या विधी सुरू असताना वारंवार वधूच्या रुममध्ये जात होता नवरदेव; बापानं कानशिलात लगावली, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 12:26 IST

लग्नाच्या दिवशी विधी सुरू असतानाच वारंवार वधूच्या खोलीत जाणं नवरदेवाला चांगलंच महागात पडलं आहे.

चित्रकूट-

लग्नाच्या दिवशी विधी सुरू असतानाच वारंवार वधूच्या खोलीत जाणं नवरदेवाला चांगलंच महागात पडलं आहे. त्याचं झालं असं की नवरदेव वधूच्या खोलीत वारंवार जात असल्याचं पाहून नाराज झालेल्या वरबापानं आपल्या मुलाच्या कानशिलात लगावली. मग नवरदेवानंही सर्वांसमोर आपल्याच बापावर हात उगारला. या घटनेनं संतापलेल्या वधूनं लग्नास नकार दिला आणि लग्न सोहळा काही होऊ शकला नाही. 

उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यातील शिवरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. येथील गावातील एका मुलीचा विवाह कानपूरच्या बर्रा येथील रहिवासी असलेल्या तरुणासोबत निश्चित झाला होता. मोठ्या थाटामाटात नवरदेवाची वरात वधूच्या घरी पोहोचली. सारंकाही आनंदात आणि सुरळीत सुरू होतं. पण वरमालाच्या विधीवेळी वधूचं सौंदर्य पाहून नवरदेवाला काही राहावेना. तो वारंवार वधूच्या खोलीत जाऊ लागला. 

खरंतर नवरदेवाला कल्पना होती की त्यांच्या कुटुंबात लग्नाच्या ४-५ दिवसांनंतरच वधूला तिच्या माहेरी पाठवलं जातं. त्यानंतर बऱ्याच काळानंतर पुन्हा वधू सासरी येते. पण नवरदेवाला ही गोष्ट काही मान्य नव्हती. तो लग्नाचे विधी सुरू असतानाच वारंवार वधूच्या खोलीत जात होता. तो वधूला वारंवार समजावण्याचा आणि सासरीच राहण्याची गळ घालत होता. 

नवरदेवाला वडिलांनी लगावली थप्पडलग्नाचे विधी सुरू असताना असं वारंवार वधूच्या खोलीत जाणं नवरदेवाच्या वडिलांना काही रुचलं नाही आणि ते चांगलेच संतापले. त्यांनी भर मंडपात आपल्याच मुलाच्या कानशिलात लगावली. यानंतर नवरदेवालाही राग अनावर झाला आणि आपल्याच वडिलांवर त्यानं हात उगारला. हे पाहून वधूला जबर धक्का बसला आणि तिनं लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिनं या कुटुंबाची सून होण्यास नकार दिला. 

वर्षभर माहेरी जाऊ देणार नाहीनवरदेव आपल्या जवळ येऊन वारंवार सांगत होता की लग्नानंतर वर्षभर माहेरी जाऊ देणार नाही. तुला सासरीच राहून शिक्षण पूर्ण करावं लागेल असा तगादा लावत होता, असा आरोप वधूनं केला आहे. नवरदेवाच्या या तगाद्यामुळे आधीच वधू वैतागली होती. त्यात थप्पड मारण्याच्या घटनेनं तिनं लग्नच मोडलं आणि वरात माघारी पाठवली.