शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कर्जांची थकबाकी वाढल्याने बँका चिंताग्रस्त; राज्य सरकारांनी वसुलीसाठी कायदा करावा- इंडियन बँकिंग असोसिएशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 08:40 IST

३७ हजार काेटी रुपयांहून अधिक कर्जे थकीत असून शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड हाेत नसल्याचा मुद्दा बँकांनी गांभीर्याने घेतला आहे.

अभिलाष खांडेकर -

भाेपाळ : अनेक राज्यांमध्ये काेट्यवधी रुपयांची कृषी कर्जे माफ करण्यात येतात. मतांवर डाेळा ठेवून घेतलेल्या अशा निर्णयांमुळे बँकांचा माेठा फायदा हाेताे; मात्र सध्या कृषी क्षेत्रातील एनपीए वाढत असल्यामुळे देशभरातील बँकांची चिंता वाढली आहे. ३७ हजार काेटी रुपयांहून अधिक कर्जे थकीत असून शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड हाेत नसल्याचा मुद्दा बँकांनी गांभीर्याने घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारांनी पावले उचलावी, अशी अपेक्षा इंडियन बँकिंग असाेसिएशनने व्यक्त केलीआहे. भारतात सर्वाधिक गव्हाचे उत्पादन मध्य प्रदेशात हाेते; मात्र वारंवार कर्जमाफीच्या अपेक्षेमुळे मध्य प्रदेशातील शेतकरी कृषी कर्जाची परतफेड करताना दिसत नाही. राज्यस्तरीय बँकिंग समितीने यासंदर्भात एक अंतर्गत गाेपनीय नाेट तयार केली आहे. त्यातून धक्कादायक माहिती ‘लाेकमत’च्या हाती आली आहे. या माहितीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे २३ हजार ६८९ काेटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. तर खासगी, सहकारी व ग्रामीण बँका मिळून १३ हजार ७२५ काेटी रुपये, असे एकूण ३७ हजार ४०० काेटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. एवढ्या माेठ्या प्रमाणावर कर्ज थकीत असल्यामुळे बँकांची चिंता वाढली आहे. बँकिंग क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या थकीत कर्जांच्या वसुलीसाठी मध्य प्रदेश सरकारने नवा कायदा करण्याची मागणी बँकांनी केली आहे. अशा प्रकारे ताेडगा काढण्यासाठी प्रथमच बँकांकडून मुद्दा मांडण्यात येत आहे. मध्य प्रदेश सरकारने याबाबत काेणतीही कठाेर कारवाईचे संकेत दिलेले नाही. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक आहे.

मुख्यमंत्र्यांसाठी तयार केली नाेट-     कृषी कर्जांमधील एनपीए हा चिंतेचा मुद्दा असून कर्जमाफीच्या अपेक्षेने शेतकरी कर्जाची परतफेड करत नसल्यामुळे ताे अधिक गंभीर हाेत असल्याचे बँकिंग समितीच्या नाेटमध्ये म्हटले आहे. -     मुख्यमंत्री शिवराजसिंह चाैहान यांच्यासाेबतच्या बैठकीमध्ये त्यांना देण्यासाठी ही नाेट बनविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

-     सर्व राज्यांनी आपापल्या राज्यातील वसुली कायदा अधिक सक्षम करावा किंवा गरज भासल्यास नवा कायदा करावा, अशी अपेक्षा इंडियन बँक असाेसिएशनने व्यक्त केली आहे.

टॅग्स :bankबँकagricultureशेती