शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार कोटी भांडवलाच्या बँक संस्थापकाचा आत्महत्येचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 08:38 IST

बँकेचे संस्थापक मोहम्मद मन्सूर खान यांची ध्वनिफीत समाजमाध्यमांवर झळकताच घाबरलेल्या ठेवीदार, खातेदारांनी बँकेच्या कार्यालयापाशी गर्दी केली. दोन हजार कोटी रुपये इतके या बँकेचे भागभांडवल आहे.

बंगळुरू : राजकारणी व नोकरशहांना पैसे चारून थकल्याने मी आत्महत्या करीत आहे, असा इशारा देणारी आय मॉनिटरी अ‍ॅडव्हायझरी (आयएमए) या बँकेचे संस्थापक मोहम्मद मन्सूर खान यांची ध्वनिफीत समाजमाध्यमांवर झळकताच घाबरलेल्या ठेवीदार, खातेदारांनी बँकेच्या कार्यालयापाशी गर्दी केली. दोन हजार कोटी रुपये इतके या बँकेचे भागभांडवल आहे.बंगळुरूच्या पोलीस आयुक्तांना उद्देशून ही ध्वनिफीत बनविण्यात आली होती. काँग्रेसचे आमदार रोशन बेग घेतलेले ४०० कोटी रुपये ते परत देण्यास तयार नाहीत. आपल्या जीवाला धोका आहे, असा दावा मोहम्मद मन्सूर खान यांनी या ध्वनिफीतीत केला आहे. ही ध्वनिफीत ऐकून संतापलेल्या ठेवीदार, खातेधारकांनी आयएमएच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मोहम्मद मन्सूर खान यांनी आत्महत्या केल्याचा पुरावा पोलिसांना मिळालेला नाही.आयएमए बँकेची २००६ साली स्थापना झाली. गुंतवणुकीवर दरमहा १४ ते १८ टक्के व्याज देण्याचे बँकेने जाहीर केल्याने लोकांनी गुंतवणूक केली. बहुतांश ठेवीदार मुस्लिम आहेत. त्यांच्याकडून जमा झालेले दोन हजार कोटी रुपये बँकेने विविध क्षेत्रांत गुंतविले आहेत.खान यांनी आपल्याला १.३ कोटी रुपयांना गंडा घातल्याची तक्रार त्यांचे बांधकाम व्यवसायातील भागीदार मोहम्मद खालिद अहमद यांनी पोलिसांत केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मोहम्मद यांची ही ध्वनिफीत प्रसारित झाली.>विरोधकांचे कारस्थान -आर. रोशन बेगखान यांच्या ध्वनिफितीतील आरोपांचा इन्कार करताना रोशन बेग म्हणाले की, आयएमए बँकेशी मी कोणताही आर्थिक व्यवहार केलेला नाही. माझ्याविरोधातील काहींनी कारस्थान रचून ही ध्वनिफीत तयार केली आहे. आयएमए बँक व्यवहारांमध्ये दुसऱ्यांदा माझे नाव गोवण्यात आले आहे. याप्रकरणी ते सायबर पोलिसांत तक्रार करणार आहेत.