शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्तेबांधणीसाठी कर्ज देण्यास बँका नाखुश : नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 00:45 IST

देशातील रस्ते बांधणी प्रकल्पांसाठी कंत्राटदारांना कर्जे देण्यात बँकांनी हात काहीसा आखडता घेतल्याने हे प्रकल्प रेंगाळण्याची भीती आहे.

नवी दिल्ली : देशातील रस्ते बांधणी प्रकल्पांसाठी कंत्राटदारांना कर्जे देण्यात बँकांनी हात काहीसा आखडता घेतल्याने हे प्रकल्प रेंगाळण्याची भीती आहे. ही माहिती दस्तुरखुद्द केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.देशात २०२२ सालापर्यंत ८४ हजार कि.मी. लांबीचे रस्ते बांधण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. मात्र, रस्ते बांधणीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना कर्जे देण्यात बँकांना जोखीम वाटते.सरतेशेवटी मंगळवारी एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्यावरच असे आवाहन करण्याची वेळ आली की, देशाची अर्थव्यवस्था, उद्योग, गुंतवणूक, कंत्राटदारांची स्थिती, नव्या नोकºया निर्माण होण्याची शक्यता अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून रस्ते प्रकल्पांच्या बांधणीसाठी बँकांनी अग्रक्रमाने कर्जे द्यायला हवीत. काही ठिकाणी अशी कर्जे दिली जात आहेत; पण ती देण्याची प्रक्रिया खूपच धीम्यागतीने सुरू आहे, अशी माहितीही नितीन गडकरी यांनी दिली.कर्जे देण्याबाबतचा निर्णय चुकला, तर सध्या जशी अनेक प्रकरणांची चौकशी सुरू आहे, तशा चौकशीला आपणासही सामोरे जावे लागेल, अशी भीती बँकांना व अधिकाºयांना वाटत आहे. त्यामुळे जोखीम घेण्यास बँका पटकन तयार होत नाहीत, असे स्टेट बँक आॅफ इंडियाचे अध्यक्ष राजेशकुमार यांनी मे महिन्यात सांगितले होते.नॅशनल हायवेला २५ हजार कोटीनॅशनल हाय-वे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एनएचएआय) एसबीआयकडून २५ हजार कोटींचे कर्ज रस्ते बांधणी प्रकल्पांसाठी घेतले आहे. अशा प्रकल्पांसाठी कर्जे देण्यात कोणतीही जोखीम नाही, हे बँकांना समजावून सांगितले पाहिजे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीroad transportरस्ते वाहतूक