शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बँक घोटाळ्यावरून संसदेत गदारोळ! अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दिवस वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:37 IST

पंजाब नॅशनल बँक घोटाळा, नीरव मोदीचे परदेशात पलायन, आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी अशा विविध विषयांच्या गदारोळात सोमवारी संसदेची वास्तू दणाणून उठली. बजेट अधिवेशनाच्या दुस-या सत्राचा पहिला दिवस गोंधळात वाहून गेला.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँक घोटाळा, नीरव मोदीचे परदेशात पलायन, आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी अशा विविध विषयांच्या गदारोळात सोमवारी संसदेची वास्तू दणाणून उठली. बजेट अधिवेशनाच्या दुस-या सत्राचा पहिला दिवस गोंधळात वाहून गेला. परिणामी लोकसभेचे १२ वाजता अन् राज्यसभेचे दुपारी २ वाजता दिवसभराकरता कामकाज तहकूब झाले.आगामी दिवसांत राफेल घोटाळा, बँक घोटाळा, आयएनएक्स मीडिया प्रकरणात कार्ती चिदंबरम यांची अटक अशा मुद्यांवर सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली आहे. कार्ती यांची अटक हा सत्ताधाºयांनी सुरू केलेला सूडाचा प्रवास आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.राष्ट्रीकृत बँकांच्या सद्यस्थितीबाबत सरकारने श्वेतपत्रिका जारी करावी, बँक घोटाळयातले आरोपी परदेशात पळून कसे जाऊ शकतात, याबाबत पंतप्रधानांनी सभागृहात निवेदन करावे, अशा मागण्या काँग्रेसने केल्या आहेत. मोदी सरकारच्या कारकिर्दीत संसदीय कामकाजाच्या दृष्टिने हे अखेरचे वर्ष आहे.६७ विधेयके मंजुरीच्या प्रतिक्षेतलोकसभेत २८ पैकी २१ विधेयके चर्चेच्या प्रतिक्षेत आहेत. ७ विधेयके स्थायी समित्या अथवा संयुक्त समित्यांकडे आहेत. मंत्रिमंडळाने मंजूर केलेले फरार आर्थिक गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्यासंबंधीचे विधेयक राज्यसभेत चर्चेला आल्यास नीरव मोदी प्रकरणी विरोधकांच्या अनेक अडचणीच्या प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागतील. नॅशनल फायनान्शिअल रिपोर्टिंग अ‍ॅथॉरिटी कायम करण्यासाठीही एक नवे विधेयक सादर केले जाणार आहे.राज्यसभेत प्रस्तावित असलेल्या ३९ पैकी १२ विधेयके लोकसभेने अगोदरच मंजूर केलेली आहेत. मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण (तीन तलाक), इंडियन मेडिकल कौन्सिल दुरूस्ती विधेयक, स्थावर संपत्ती अधिग्रहण दुरूस्ती विधेयक, भूसंपादन, पुनर्वसन, नि:पक्ष व पारदर्शी नुकसान भरपाई मोबदला दुरूस्ती विधेयक, व्हिसल ब्लोअर संरक्षण दुरूस्ती विधेयक, मोटार वाहन दुरूस्ती विधेयक, भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरूस्ती विधेयक २0१३ या विधेयकांना राज्यसभेची मंजूरी मिळताच राष्ट्रपतीच्या संमतीने त्यांचे लगेच कायद्यात रूपांतर होईल.सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बँका रिकाम्या झाल्या आहेत. कारण नीरव मोदींसारखे घोटाळेबाज फरार झाले आहेत आणि सरकार गप्प आहे. विरोधी पक्षांचे सर्व सदस्य तयार असतील, तर आमची चर्चेला हरकत नाही.- गुलाम नबी आझाद,विरोधी पक्षनेते, राज्यसभा.

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा