शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
2
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
3
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
4
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
5
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
6
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
7
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
8
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
9
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
10
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
11
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
12
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
13
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
14
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
15
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
16
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर
17
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
18
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
19
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
20
बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांच्याच जीवाशी खेळ; सरकारी रुग्णालयातील जेवणात अळ्या, सोंडे

10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:18 IST

Bank Of Baroda Recruitment 2025: देशातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने दहावी पास उमेदवारांसाठी भरती जाहीर केली.

बँकेतनोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. देशातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने दहावी पास उमेदवारांसाठी विविध पदांसाठी भरती जाहीर केली. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे २०२५ असून त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. 

बँक ऑफ बडोदामध्ये शिपाई पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली. यात एकूण ५०३ जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्राच्या वाट्याला २९ जागा आल्यात. सदर उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. दरम्यान, या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी असेल, निवड झालेल्या उमेदवारांना किती पगार दिला जाईल? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रियाया भरतीसाठी अर्ज शुल्क ६०० रुपये आहे. तर एससी/एसटी प्रवर्ग, अपंग आणि महिलांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. ऑनलाइन चाचणी आणि कागदपत्र पडताळणीनंतर उमेदवारांची निवड करण्यात येईल.

बँक ऑफ बडोदा भरती: वयया नोकरीसाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २६ वर्षे असावे. ०१/०५/१९९९ आधी जन्म झालेले उमेदवार या नोकरीसाठी पात्र नाहीत.

बँक ऑफ बडोदा: पगारबँक ऑफ बडोदामधील ऑफिस असिस्टंट म्हणजेच शिपाई यांचे वेतनमान दरमहा १९ हजार ५००-३७ हजार ८१५ रुपये इतके असेल.

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. 

टॅग्स :jobनोकरीbankबँक