शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बँक खाती ३0 एप्रिलपूर्वी आधारशी जोडा!

By admin | Updated: April 13, 2017 04:15 IST

जुलै २0१४ ते आॅगस्ट २0१५ या काळात काढण्यात आलेल्या बँक खात्यांची केवायसी पूर्तता, तसेच आधार क्रमांक जोडणी ३0 एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश प्राप्तिकर विभागाने दिले

नवी दिल्ली : जुलै २0१४ ते आॅगस्ट २0१५ या काळात काढण्यात आलेल्या बँक खात्यांची केवायसी पूर्तता, तसेच आधार क्रमांक जोडणी ३0 एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश प्राप्तिकर विभागाने दिले आहेत. याच कालावधीत विदेशी कर अनुपालन कायद्याचे (एफएटीसीए) पालन करीत असल्याबाबत स्वप्रमाणीकरण करण्याच्या सूचनाही विभागाने दिल्या आहेत. केवायसी, आधार जोडणी आणि एफटीसीए प्रमाणीकरण विहित मुदतीत न केल्यास बँका आणि वित्तीय संस्था संबंधित खाती गोठवू शकतात. संबंधित तपशील सादर केल्यानंतरच संबंधित खाती पुन्हा सुरू होऊ शकतील. या तरतुदी एफएटीसीए नियमांतर्गत येणाऱ्या सर्व खात्यांना लागू आहेत. प्राप्तिकर विभागाच्या वतीने बँका आणि वित्तीय संस्थांना या संबंधीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. १ जुलै २0१४ ते ३१ आॅगस्ट २0१५ या कालावधी खाती उघडणाऱ्या सर्व व्यक्ती आणि संस्था यांच्यासाठी हे आदेश बंधनकारक आहेत. त्यानुसार, भारत आणि अमेरिकेने स्वाक्षरी केलेल्या विदेशी खाते कर अनुपालन कायद्याशी संबंधित तरतुदींचे पालन करीत असल्याचे स्वप्रमाणपत्र बँका खातेदारांकडून घेतील. एफएटीसीए कायद्यांतर्गत जुलै २0१५ मध्ये भारत आणि अमेरिकेने कर विषयक माहिती सामायिक करण्यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. कर चुकवेगिरीची माहिती एकमेकांना आपोआप मिळावी, हा या कराराचा उद्देश आहे.प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३0 एप्रिलपूर्वी स्वप्रमाणीकरण न केल्यास, बँक खाते बंद करण्यात येईल. संबंधित माहितीचा तपशील प्राप्त होईपर्यंत, खातेदार या खात्यावरून कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू शकणार नाहीत. बँक खात्यांप्रमाणेच विमा आणि शेअर बाजारातील खात्यांनाही हा नियम लागू आहे.