शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जवानांवर बांगलादेशी ग्रामस्थांचा हल्ला; दोन जणांची प्रकृती गंभीर; शस्त्रेही पळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2023 08:22 IST

बीएसएफने जारी केलेल्या निवेदनानुसार, बंगाल फ्रंटियरच्या बेरहामपूर सेक्टर परिसरात ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर १००हून अधिक बांगलादेशी ग्रामस्थांनी हल्ला केला. त्यात दोन जवान गंभीर जखमी झाले. भारतीय शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी बीएसएफचे जवान आपल्या कर्तव्यावर होते. तेव्हाच त्यांच्यावर सीमेपलीकडून हल्लेखोरांनी हल्ला केला आणि त्यांची शस्त्रेही लुटली.

बीएसएफने जारी केलेल्या निवेदनानुसार, बंगाल फ्रंटियरच्या बेरहामपूर सेक्टर परिसरात ही घटना घडली. भारतीय शेतकऱ्यांनी तक्रार केली होती की, बांगलादेशी शेतकरी त्यांची गुरे चरण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांच्या शेतात घुसवतात आणि त्यांच्या पिकांचे जाणूनबुजून नुकसान करतात. भारतीय शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बीएसएफच्या जवानांनी सीमेजवळ तात्पुरती चौकी उभारली होती.

काठ्या, धारदार शस्त्रांनी हल्लाजवानांनी बांगलादेशी शेतकऱ्यांना रोखल्यानंतर गावकरी आणि बदमाशांनी भारतीय हद्दीत घुसून जवानांवर लाठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान गंभीर जखमी झाले. त्यांची शस्त्रे हिसकावून हल्लेखोर पळून गेले. यानंतर बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची पुनरावृत्ती रोखण्यासाठी तत्काळ बॉर्डर गार्ड्स बांगलादेश (बीजीबी) अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देत ध्वज बैठक आयोजित करण्यास सांगितले. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश