शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वांद्रे देशातील सातवे स्वच्छ रेल्वे स्टेशन , जोधपूर, जयपूर, तिरुपती पहिल्या तीन स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 04:21 IST

रेल्वेच्या सर्वांत स्वच्छ स्टेशनच्या यादीत ए १ श्रेणीत महाराष्ट्रातील वांद्रे स्टेशन सात नंबरवर आहे तर, दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशन या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली - रेल्वेच्या सर्वांत स्वच्छ स्टेशनच्या यादीत ए १ श्रेणीत महाराष्ट्रातील वांद्रे स्टेशन सात नंबरवर आहे तर, दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशन या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. नागपूर या यादीत ३२व्या क्रमांकावर आहे. पहिल्या तीन क्रमांकांवर जोधपूर, जयपूर आणि तिरुपती रेल्वे स्टेशन आहेत. देशाच्या ए श्रेणी स्थानकात महाराष्ट्रातील एकाही रेल्वे स्टेशनाचा समावेश नाही. या यादीत पहिल्या दोन स्थानांवर राजस्थानचे मारवाड आणि फुलेरा यांचा समावेश आहे. तर, तिसऱ्या क्रमांकावर दक्षिणेतील वारांगल रेल्वे स्टेशनचा क्रमांक आहे. ए १ श्रेणी आणि ए श्रेणीत राजस्थानचे सर्वाधिक स्टेशन्स आहेत.रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले, ज्या रेल्वे स्टेशनमध्ये सर्वाधिक सुधारणा दिसून आल्या त्या ए १ श्रेणीच्या रेल्वे स्टेशनमध्ये मुंबईतील सीएसएमटी आणि दादर यांचा समावेश आहे. तर या यादीत सर्वाधिक सुधारणा भोपाळ रेल्वे स्थानकाने केली आहे.रेल्वेमंत्र्यांकडून जारी अहवालानुसार, ए १ श्रेणीच्या रेल्वे स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील मुंबई सीएसएमटी १३व्या क्रमांकावर आहे. तर, पुण्याला यात २५वा क्रमांक मिळाला आहे. नागपूर ३२व्या तर, लोकमान्य टिळक रेल्वे स्टेशन ३५व्या स्थानावर आहे. मुंबई सेंट्रल ४०व्या, सोलापूर ४८, ठाणे ५७, कल्याण ७४व्या क्रमांकावर आहे.ए श्रेणीच्या रेल्वे स्टेशनमध्ये बडनेरा २६, अकोला २७, नाशिक रोड ४१, वास्को दी गामा ५७, नडियाद ७५, अमरावती ७८, वर्धा ८३, कोल्हापूर ११७, मनमाड १४३, अहमदनगर १५८, कुरुंदवाडी १६८, जळगाव १८४, लातूर २१२, शिर्डी २२०, चंद्रपूर २२२, पनवेल २४३, लोणावळा २६३, कोपरगाव २८व्या स्थानी आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबई