शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत घुमला बळीराजाचा आवाज; भाजपाविरोधातील पक्ष शेतकऱ्यांसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 05:51 IST

एल्गार : देशातील लाखाहून अधिक शेतकºयांचा सहभाग

- विश्वास खोड/सुमेध बनसोड

नवी दिल्ली : शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळावा आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, या मागणीची विधेयके संसदेने मान्य न केल्यास भाजपा सरकारला जावे लागेल, असा इशारा जंतरमंतर येथे शेतकरी नेत्यांनी दिला. देशभरातून आलेले शेतकरी संसद भवनाबाहेर ‘नरेंद्र मोदी, किसानविरोधी’ अशा घोषणा देत होते.

या मोर्चाला भाजपाविरोधातील सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आणि विशेष म्हणजे त्या पक्षांचे नेतेही मोर्चानंतरच्या सभेत सहभागी झाले. त्यामुळे हा मोर्चा मोदीविरोधकांचे व्यासपीठच बनला होता.

किसान संघर्ष समन्वयन समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रामलीला मैदानातून प्रचंड मोर्चा काढला. जंतरमंतर येथे सभेमध्ये कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, शरद पवार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, फारुख अब्दुल्ला, सीताराम येचुरी, शरद यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, समन्वयन समितीचे निमंत्रक व्ही.एम. सिंग, मेधा पाटकर आदींनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली.शेतकऱ्यांच्या भविष्याचा व युवकांच्या रोजगाराचा प्रश्न बिकट आहे. हे युद्ध शेतकरी-युवकांच्या भविष्यासाठीचे आहे. मोदी धनाढ्यांचे साडेतीन लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करतात, मग कोट्यवधी शेतकऱ्यांचे कर्ज माफ का होत नाही, असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला. शरद पवार यांनी शेतकºयांविषयी सत्ताधाºयांच्या मनात आकस असल्याचा आरोप केला.

साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांला ३० हजार रुपयांचे कर्ज मिळत नाही, भाजपा कार्यालयासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च केले जातात, अशी टीका करून खा. राजू शेट्टी यांनी शेतकरी प्रश्न सोडविण्यासाठी, उत्पादन खर्चाच्या दीडपट भावासाठी विशेष अधिवेशन का घेतले जात नाही, असा सवाल केला.कोणाचा सहभाग?महाराष्ट्रातील लोकसंघर्ष संघटनेच्या प्रतिभा शिंदे यांच्यासह तामिळनाडूचे अय्याकोंडू, कम्युनिस्ट कार्यकर्ते हनन मौला, पंजाबमधील बुटासिंग बुडगिल, तेजिंदरसिंग विर्क, उत्तर प्रदेशमधील आशिष मित्तल, कर्नाटकातील नेते कोडीहेल्लू चंद्रशेखर, मध्य प्रदेशातील डॉ. सुनीलम, रामसिंग स्वराज अभियानचे योगेंद्र यादव, शेतीविषयक प्रश्नाचे अभ्यासक पी. साईनाथ, निवृत्त मेजर जनरल सतवीरसिंग, कम्युनिस्ट नेते अतुल अन्जान यांनीही भाषणांद्वारे शेतकºयांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. देशभरातील २१0 शेतकरी संघटना यात सहभागी झाल्या.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्ली