शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

Eid al-Adha 2021: बकरी ईदला होणाऱ्या जनावरांच्या 'कुर्बानी'ला विरोध; मुस्लीम तरुणाचा 72 तासांचा रोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 13:00 IST

हुसैन यांनी जेव्हापासून प्राण्यांसोबत होणाऱ्या क्रोर्यावर बोलायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून त्यांना सोशल मिडियावर धमक्या येऊ लागल्या आहेत...

नवी दिल्ली - आज देशभरात ईद उल अजहा अर्थात बकरी ईद सण साजरा होत आहे. मात्र, यातच बंगालमध्ये एक मुस्लीम युवक असाही आहे, जो ईदनिमित्त होणारी जानवरांची कुर्बानी बंद करण्यात यावी, अशी मागणी करत निदर्शन करत आहे. कोलकात्यातील 33 वर्षीय अल्ताब हुसैन यांनी ईदनिमित्त होणाऱ्या जनावरांच्या कुर्बानी विरोधात मंगळवारच्या रात्रीपासून 72 तासांचा रोजा धरला आहे. सांगण्यात येते, की अल्ताब यांच्या भावाने बकरी ईदनिमित्त एक बकरा कुर्बानीसाठी घरी आणल्याने ते नाराज झाले.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, कुर्बानीला विरोध करणारे अल्ताब हुसैन यांचे म्हणणे आहे, की हे प्राण्यांसोबत क्रूरपणे वागणे आहे आणि कुणीही याला विरोध करत नाहीत. प्राण्यांचा बळी आवश्यक नाही, याची जाणीव लोकांना करून देण्यासाठी मी 72 तासांचा उपवास म्हणजेच रोजा धरण्याचा निर्णय घेतला आहे. हुसैन यांनी 2014 मध्येच प्राण्यांच्या अधिकारासाठी प्रचार करायला सुरुवात केली. डेअरी उद्योगात त्यांनी प्राण्यांसोबत होणाऱ्या क्रुरतेवरील व्हिडिओ पाहिला. यानंतर त्यांनी मांसाहार करणे सोडले आणि शाकाहारी बनले. एवढेच नाही, तर त्यांनी चामड्याच्या वस्तूंचा वापर करणेही बंद केले आहे. 

ते म्हणाले, मीही प्राण्यांच्या कुर्बानीत भाग घेत होतो. मात्र, एका व्हिडिओत मी पाहिले, की गाईंना कशा प्रकारे पाठीवर काठ्यांनी मारले जाते, त्यांना कशा प्रकारे दूध देण्यासाठी इंजेक्शन्सचा वापर केला जातो, गाईच्या वासरांना वेगळे करून कशाप्रकारे कत्तलखान्यात पाठविले जाते, यानंतर मला वाटले, की मी असे करणे योग्य नाही. मी मांस, मासे, मध अथवा चांबड्याची उत्पादने वापरत नाही.

सोशल मिडियावर येतायत धमक्या -तीन वर्षांपूर्वीही, हुसैन यांच्या भावाने ईदनिमित्त कुर्बानी देण्यासाठी घरी जनावर आणले होते. तेव्हाही हुसैन यांनी विरोध केला होता आणि त्यावर्षी त्यांना जनावर वाचविण्यात यश आले होते. मात्र, हुसैन यांचे कुटुंब त्यांना सपोर्ट करत नाही. हुसैन यांचे म्हणणे आहे, की त्यांनी जेव्हापासून प्राण्यांसोबत होणाऱ्या क्रोर्यावर बोलायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून त्यांना सोशल मिडियावर धमक्या येऊ लागल्या आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणावर लोकांनी त्यांना समर्थनही दर्शवले आहे.

टॅग्स :Bakri Eidबकरी ईदMuslimमुस्लीमwest bengalपश्चिम बंगालIslamइस्लामAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार