शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बजरंग दल, विहिंपला केंद्राचं छुपं प्रोत्साहन- मल्लिकार्जून खरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 14:54 IST

देशभरात जमावाकडून लोकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले.

ठळक मुद्दे देशभरात जमावाकडून लोकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले.काँग्रेसचे नते आणि खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षकांना केंद्र सरकारकडून छुपं प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप मल्लिकार्जून खरगे यांनी केला

नवी दिल्ली, दि. 31- देशभरात जमावाकडून लोकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले. यावेळी काँग्रेसचे नते आणि खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षकांना केंद्र सरकारकडून छुपं प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी केला. गेल्या ७० वर्षात देशात अशा घटना घडल्या नव्हत्या पण मोदी सरकार आल्यावर अशा प्रकारच्या घटना घडू लागल्याची टीका मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे. 

देशातील विविध राज्यांमध्ये सर्वसामान्यांना फक्त संशयावरून जमावाकडून मारहाण तसंच हत्या झाल्याची घटना समोर आली होती. यावरुन लोकसभेत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. गेल्या ७० वर्षात देशात अशा स्वरुपाच्या घटना घडली नव्हती. भाजपशी संबंधीत असलेल्या संघटनांचा या घटनांशी संबंध आहे,असं खरगे म्हणाले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांचा हल्ल्यांशी संबंध असल्याचं समोर आलं. पण त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप खरगेंनी केला. मध्य प्रदेश, झारखंड हे राज्य जमावाकडून होणाऱ्या मारहाणीचे केंद्र बनल्याची टीका खरगे यांनी केली आहे. देशात दलित, अल्पसंख्याक आणि महिलांची हत्या होत असून भाजप या मारेकऱ्यांचे समर्थन करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. देशभरात सध्या दहशत आणि भीतीचं वातावरण असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

भाजपकडून काँग्रेसला उत्तर

काँग्रेसच्या या आरोपांवर भाजपकडूनही उत्तर देण्यात आलं. भाजप खासदार हुकूमदेव नारायण यादव यांनीदेखील चर्चेत सहभाग घेत काँग्रेसवर टीका केली. मोदींनी या घटनांचा निषेध दर्शवला आहे. आता कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राज्यांची आहे. केंद्र सरकार दरवेळी निमलष्करी दलाची तुकडी पाठवू शकत नाही, असं हुकुमदेव नारायण यादव म्हणाले आहेत. तसंच ट्रेनमध्ये जुनेदच्या झालेल्या हत्येचा उल्लेखही यादव यांनी केला. ट्रेनमध्ये सीटच्या वादावरून जुनेदची हत्या झाली होती. या घटनेला धर्माशी का जोडता ? असा सवालही यादव यांनी केला.

गुजरातच्या मुद्द्यावरूनही टीकाराज्यसभेत काँग्रेसने गुजरातच्या मुदुद्यावरुन भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी संसदेच कामकाज सुरू होताच काँग्रेसकडून गुजरातच्या मुद्द्यावर गदारोळ केला. भाजप काँग्रेसचे आमदार विकत घेत असल्याचा आरोप काँग्रेस खासदारांनी केला. काँग्रेस खासदारांच्या गदारोळामुळे कामकाज काही वेळेसाठी तहकूब करावं लागलं. यावेळी काँग्रेसच्या खासदारांनी वेल जवळ येऊन घोषणाबाजीही केली.