शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात युसूफचा दबदबा; TMC च्या पठाणची जोरदार 'बॅटिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 14:59 IST

Baharampur Lok Sabha Result 2024 : युसूफ पठाण आघाडीवर.

Lok sabha Election Result 2024 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युसूफ पठाण तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेच्या मैदानात आहे. पश्चिम बंगालमधील बहरामपूर या जागेवरून तो नशीब आजमावत आहे. इथे काँग्रेस उमेदवार अधीर रंजन चौधरी आणि भाजप उमेदवार डॉ. निर्मल कुमार शाह यांच्याशी युसूफची लढत आहे. मतांची मोजणी सुरू असून, आतापर्यंतचा कल युसूफच्या बाजूने लागला आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू २३ हजार १४८ मतांनी आघाडीवर आहे. (Lok Sabha Elections Result 2024, Yusuf Pathan)

जर आपण विधानसभा निवडणुकीबद्दल भाष्य केले तर, बहरामपूरमधील सात विधानसभा जागांपैकी सहा जागा टीएमसीकडे आहेत, तर एक जागा भाजपकडे आहे. त्यामुळे लोकसभेसाठी टीएमसीने नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवला. मूळचा गुजरातचा असलेला युसूफ पठाण फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. पण, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांचे आभार मानले होते. मुस्लिम मतदारांची संख्या पाहता टीएमसीने युसूफला लोकसभेच्या मैदानात उतरवले. 

बहरामपूर मतदारसंघातील जातीय समीकरणबहरामपूर लोकसभा मतदारसंघात हिंदू आणि मुस्लीम, दोन्ही समुदायातील लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. २०१९ ची निवडणूक पाहिली तर या जागेवर १६ लाख ३२ हजार ८७ मतदार होते. त्यातील मुस्लीम मतदारांची संख्या तब्बल ८ लाख ४८ हजार इतकी होती. म्हणजे ५२ टक्के मतदार हे मुस्लीम समुदायातील होते. तर बहरामपूर लोकसभा जागेवर १३ टक्के एससी, १ टक्के एसटी मतदारही आहेत. 

ममता बॅनर्जींची खेळी!पश्चिम बंगालमधील 'इंडिया' आघाडी तुटण्याचे कारण अधीर रंजन चौधरी असल्याचे बोलले जाते. त्यांच्यामुळेच काँग्रेस आणि टीएमसीमध्ये जागावाटपावर कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. अधीर रंजन चौधरी १९९९ पासून बहरामपूरचे खासदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी टीएमसीच्या अपूर्ब सरकार यांचा पराभव केला. अधीर रंजन यांची त्यांच्या लोकसभा मतदारसंघावर चांगली पकड आहे. टीएमसीने युसूफ पठाणला उमेदवारी देण्यामागील कारण म्हणजे बहरामपूर हा मुस्लिमबहुल भाग आहे. युसूफ पठाणला तिकीट देऊन टीएमसीने अल्पसंख्याकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Lok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्सYusuf Pathanयुसुफ पठाण